३१२ फूट उंचीवरील जगातील सर्वांत लांब झुलता पूल पर्यटकांसाठी खुला; पाहा फोटो

ढगांनी आच्छादलेल्या जेसेन्की पर्वतांची प्रेक्षणीय दृष्ये, तसेच एक रोमांचक, परंतु थोडा भयानक अनुभव पर्यटकांना इथे घेता येणार आहे.

At 312 feet the world longest suspension bridge is open to tourists
या पुलाला 'स्काय ब्रिज ७२१' असे नाव देण्यात आले आहे. (Photo : Twitter/@poloconghaile)

चेक रिपब्लिकमधील जगातील सर्वात मोठा झुलता पूल पर्यटकांसाठी खुला झाला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. सुमारे दोन वर्षांपासून बांधकाम सुरू असलेला हा पूल शुक्रवारी अधिकृतपणे खुला करण्यात आला. त्याला ‘स्काय ब्रिज ७२१’ असे नाव देण्यात आले आहे. ढगांनी आच्छादलेल्या जेसेन्की पर्वतांची प्रेक्षणीय दृष्ये, तसेच एक रोमांचक, परंतु थोडा भयानक अनुभव पर्यटकांना इथे घेता येणार आहे.

हा पूल दोन पर्वतरांगाना जोडतो आणि तो दरीच्या वर ९५ मीटर (३१२ फूट) लटकता आहे तसेच त्यात प्रवेश करण्यासाठी केबल कारचा उपयोग करण्यात येणार आहे. तो ७२१ मीटर म्हणजेच २,३६५ फूट लांब आहे. पर्यटक १,१२५ मीटर उंचीवरून त्यात प्रवेश करतील आणि १० मीटर उंचावरून बाहेर पडतील.

सापांचे असे दृश्य तुम्ही कधीही पाहिले नसेल; ‘हा’ Viral Video बघून तुमच्याही अंगावर येईल काटा

पुलाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हा एकेरी मार्ग असेल. दुसर्‍या बाजूने पर्यटक एका जंगलातील एका पक्क्या मार्गावर बाहेर पडतील जेथे पर्यटकांना चेक रिपब्लिकच्या इतिहासाबद्दल माहिती मिळेल. व्हेकेशन रिसॉर्ट, जिथे हा पूल आहे, त्यांनी सांगितले की १.२ मीटर रुंद हा पूल सर्व वयोगटातील आणि उंचीच्या लोकांसाठी खुला आहे, परंतु पुशचेअर किंवा व्हीलचेअरचा वापर करणाऱ्या लोकांना येथे प्रवेश मिळणार नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या झुलत्या पूलची किंमत २०० दशलक्ष क्राऊन आहे, जी सुमारे ८.४ दशलक्ष डॉलर आहे.

राहतं घर विकून जोडप्याने क्रूझ जहाजावर हलवला कायमचा मुक्काम; कारण वाचून व्हाल थक्क

महिलेने एकाचवेळी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच मुलांना दिला जन्म; हॉस्पिटलमधील कर्मचारीही झाले हैराण

चेक रिपब्लिक स्काय ब्रिज ७२१ नेपाळच्या बागलुंग परबत फूटब्रिजपेक्षा १५४ मीटर लांब असून याने सध्या सर्वात लांब सस्पेंशन फूटब्रिजसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. स्काय ब्रिज ७२१ हे चेकची राजधानी प्राग येथून सुमारे २.५ तासांच्या अंतरावर आहे. चेक रिपब्लिक हा मध्य युरोपातील लँडलॉक देश आहे. त्याची सीमा दक्षिणेला ऑस्ट्रिया, पश्चिमेला जर्मनी, ईशान्येला पोलंड आणि आग्नेयला स्लोव्हाकियाला लागून आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: At 312 feet the world longest suspension bridge is open to tourists see photo pvp

Next Story
“CSK जा जा जा…” मुंबई विरुद्ध चेन्नईच्या मॅच दरम्यानचा वानखेडे स्टेडियमवरचा भन्नाट Video Viral
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी