देशातील मोठमोठ्या विमानतळांवर परदेशातू सोने, दागिने किंवा ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना पकडल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा पाहिल्या आहेत. शिवाय तस्करी करणारे लोक आपल्याकडील वस्तू लपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. ज्याची अनेकदा आपण कल्पना देखील करु शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सोन्याची तस्करी करण्यासाठी असं काही केलं आहे जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

ANI ने दिलेल्या माहितीनुसार, तीन विदेशी नागरिकांना मुंबई विमानतळावर पकडण्यात आले आहे. या लोकांकडून तब्बल १.४ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हे परदेशी नागरिक आदिस अबाबाहून मुंबईत आले होते. त्यांनी अंडरवेअर आणि बुटांच्या तळव्यामध्ये सोने लपवले होते. एकूण सोने ३ किलोपेक्षा जास्त होते आणि त्याची किंमत अंदाजे १.४० कोटी रुपये आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लोकांना तस्करीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं आहे. अशाप्रकारे सोने लपवण्याचे कारण काय, याची माहिती या लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Pimpri, Instagram friendship, theft, Woman flees, man's phone, meetup,
मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….
share market akola
सावधान! शेयर मार्केटमधून नफ्याचे आमिष; वृद्ध डॉक्टरची ६४.५० लाखांनी फसवणूक

हेही पाहा- Video: “ही आमची जमीन…” कन्नडमध्ये बोलली नाही म्हणून रिक्षा चालकाने तरुणीला खाली उतरवलं अन्…

हेही पाहा- डॉक्टरांनी सांगितलेल्या वाईट बातमीमुळे बदललं जीवन; पठ्ठ्याने कमी केलं तब्बल १६५ किलो वजन

शरीरातही लपवतात सोने –

यापुर्वी देखील अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात लोक चक्क शरीराच्या अवयवांमध्ये द्रव अवस्थेत सोने लपवतात. मात्र, सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांपासून ते सुटत नाहीत आणि अनेकदा विमानतळावरच पकडले जातात. अशा प्रकारे सोने आणण्याचा उद्देश इतर मार्गांनी आयात शुल्क आणि कर टाळणे हा असतो.