VIRAL VIDEO: लग्नात नवरदेवाने केला नवरीच्या पायाला स्पर्श! नेटिझन्सने केले कौतुक

हा लग्नसमारंभातील वधू वराचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत असून, याला ६ लाखांहून जास्त अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

At the wedding ceremony, the desi husband touched the bride's feet
नवऱ्याने नवरीच्या पायाला स्पर्श करत केला नमस्कार( photo: instagram/ditigoradia)

सध्या लग्नसराई दणक्यात सुरू असून, सोशल मिडियावर लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. लग्न म्हटलं की, फक्त नवरा-नवरी नाही तर सगळे नातेवाईक, मित्र परिवार एकत्र येऊन लग्नात मौज मज्जा करतात. यावेळी नवरा-नवरीची एन्ट्री, नातेवाईकांचे काही मजेशीर डान्स किंवा त्यांच्या फजितीचे व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असतात. सध्या लग्नातील असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर कमालीचा ट्रेण्डींग होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये नवऱ्याने नवरीसोबत असं काही कृत्य केलंय की तुम्हाला देखील बघून नक्कीच कौतुक वाटेल.

आपल्या संस्कृतीनूसार लग्नात एक तरी असा विधी असतोच, की त्यामध्ये नवरी नवऱ्याच्या पाया पडते. लग्नात नवऱ्याच्या पाया पडणं हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. पण इथे एका लग्नात मात्र उलटंच झालं. या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, नुकतंच लग्न होऊन नवरा-नवरी स्टेजवर बसले आहेत. त्यानंतर नवरा खुर्चीवरून अचानक उठतो आणि नवरीच्या पाया पडतो. अचानक नवऱ्याने आपल्या पाया पडल्याने नवरी देखील क्षणभर गोंधळून जाते. पाया पडल्यानंतर तो तिला जवळही घेतो. यावेळी नवरीच्या चेहऱ्यावर आनंद, आदर, प्रेम असे सगळेच भाव दिसून आलेले पाहायला मिळतात. मात्र, नवरदेवाने केलेलं कृत्य पंडितजींना आवडलं नव्हतं, पण नंतर ते नवरीला ‘नशीबवान मुलगी आहेस’ असं देखील म्हणाले होते.

( हे ही वाचा: लग्नात डान्स करताना अचानक स्लॅब खचला अन्…; बघा Viral Video)

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ ditigoradia इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ५ ते ६ सेकंदाचा असून, आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तसंच या व्हिडीओला जवळपास चार लाखांहून जास्त लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडीओला अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने गमतीने म्हटलंय की, “काळजी करू नका पंडित तुमच्याबरोबर राहणार नाही” तर अजून एकाने म्हटलंय की, “आता असं दिसतंय की, आमची पिढी योग्य गोष्टी करत आहे. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: At the wedding ceremony the desi husband touched the brides feet netizens praised on social media watch viral video gps

Next Story
कंपनीकडून चुकून मिळाला १.४२ कोटी रुपये पगार! राजीनामा देऊन कर्मचारी फरार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी