खांदा, गुडघा निखळणं ही एक सामान्य समस्या मानली जाते. त्यात त्या व्यक्तीचं गुडघा किंवा खांद्याचं हाड त्याच्या जागेवरून घसरतं. अशा परिस्थितीत व्यक्तीला चालणं तर सोडा; पण साधं उभं राहणंदेखील अवघड होऊ बसतं. विशेषत: कुस्ती किंवा इतर खेळ खेळताना गुडघ्याची हाडं निखळण्याचा त्रास होऊ शकतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी किंमत चुकवावी लागते. अशाच प्रकारे व्हायरल व्हिडीओमध्ये एका खेळाडूच्या गुडघ्याची हाडं निखळली आणि तो कोसळून खाली पडतो. त्याच्या गुडघ्याची हाडं अशा प्रकारे निखळतात, जे पाहिल्यावर ती पुन्हा कधीच ठीक होणार नाहीत, असं वाटतं. पण, एक प्रशिक्षक व्यक्ती अवघ्या काही सेकंदांत निखळलेली हाडं पुन्हा होती तशी बसवते. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका खेळाडूच्या गुडघ्याची हाडं एकमेकांपासून पूर्णपणे निखळली होती. ते दृश्य पाहताना फारच भयानक दिसत होतं. यावेळी त्या व्यक्तीला किती वेदना झाल्या असतील याचा विचार करणंही अवघड आहे. यावेळी इतर तरुण त्याला जमिनीवर झोपवतात आणि पाय सरळ ठेवण्यास सांगतात. त्यानंतर एक प्रशिक्षक तिथे येतो आणि तो पद्धतशीरपणे तरुणाच्या गुडघ्याची निखळलेली हाडं पहिली होती तशी जागच्या जागी बसवतो. ही स्थिती प्रशिक्षकानं कशी व्यवस्थितरीत्या हाताळली ते पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

No concern at all over Virat Kohlis form Team India batting coach Vikram Rathour reaction in T20 WC 2024 Performance
T20 WC 2024 : विराट कोहलीच्या फॉर्ममुळे टीम इंडिया चिंतेत? फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले, “दोन-तीन वेळा अशा प्रकारे आऊट…”
BCCI should give time to Gautam Gambhir Anil Kumble's reaction to the selection of India's head coach
“भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी…”, अनिल कुंबळेचे गौतम गंभीरच्या प्रशिक्षक होण्याच्या चर्चांवर मोठे वक्तव्य
a father helps mother from last 35 years a true lovely life partner a daughter shared post viral
Video : जोडीदार असावा तर असा! “गेल्या ३५ वर्षांपासून बाबा स्वयंपाकघरात आईला मदत करतात” तरुणीची पोस्ट व्हायरल
Abhishek Nayar Statement on Sex in cricket
‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”
Rahul Dravid comments on coaching post
T20 World Cup 2024 : राहुल द्रविड म्हणतो, आमुचा रामराम घ्यावा
Jay Shah Statement on India Head Coach Offer
“प्रशिक्षक पदासाठी कोणत्याच ऑस्ट्रेलियन खेळाडूशी चर्चा केली नाही…” जय शाह यांनी पाँटिंग-लँगरची केली पोलखोल
Two bulls were fighting with each other
“आ बैल मुझे मार” पिसाळलेल्या बैलांची भांडण सोडवायला गेला अन् पुढच्याच क्षणी…घटनेचा थरारक VIDEO व्हायरल
Success Story of PSI sanjay vighne
VIDEO: “हरलेला डावही जिंकता येतो” १२वीला गणितात ३५ टक्के; पीएसआय अधिकाऱ्याची मार्कशीट व्हायरल

उन्हाळ्यात १० रुपयांची लोकल ब्रँडची आइस्क्रीम आवडीने खाणाऱ्यांनो फॅक्टरीतील ‘हा’ VIDEO पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा विचार कराल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ @masterchrisleong नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे; ज्याला एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत; तर शेकडोंनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी प्रशिक्षकाच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे. तर, अनेकांनी त्या तरुणाला आता ठीक वाटलं असेल, असं म्हणत हा त्याचा एक प्रकारे पुर्नजन्म होता, असं म्हटलंय.

दरम्यान, खेळताना हाडं सांध्यापासून निखळणं हे फार वेदनादायी असतं. त्यामुळे खेळाडू पटकन खेळू तर शकत नाही; पण त्याला सामान्य काम करतानाही अडचणी येतात. कधी कधी एखाद्या निखळलेल्या सांध्याला धक्का लागल्याने किंवा पडल्यामुळेही समस्या उदभवू शकते. त्यामुळे ही स्थिती खेळाडूसाठी फार भयानक अनुभवासारखी असते. मात्र व्हिडीओतील लहान तरुणाने तीव्र वेदना सोसल्या पण प्रशिक्षकाच्या मदतीने तो पुन्हा ठीक झाल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता खूप व्हायरल होतोय,