‘तेरी सेकेंड हँण्ड जवानी…’ या गाण्यावर आंटीचा वजनदार डान्स; व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी दिली दाद

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे एका रात्रीत एखादी व्यक्ती स्टार बनून जाते.

Aunty_Dance
'तेरी सेकेंड हँण्ड जवानी…' या गाण्यावर आंटीचा वजनदार डान्स; व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी दिली दाद (Photo- Viral Video Grab)

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे एका रात्रीत एखादी व्यक्ती स्टार बनून जाते. ध्यानीमनी नसताना व्हिडीओ नेटकरी डोक्यावर धरतात. तसेच एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धीच्या झोतात आणतात. सोशल मीडियामुळे आतापर्यंत अनेकांना प्रसिद्धी मानसन्मान मिळाला आहे. आता एका टीव्हीवरील डान्स शोमध्ये आंटीने जबरदस्त डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आंटीच्या जबरदस्त डान्स स्टेप्स पाहून नेटकऱ्यांनी दाद दिली आहे.

व्हायरल व्हिडीओत एक लाल रंगाची साडी परिधान केलेली महिला जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. बॉलिवूडमधील कॉकटेल चित्रपटातील ‘तेरी बँड जवानी, तेरी बँड जवानी..नहीं चाहिए मुझको तेरी सेकेंड हँण्ड जवानी’ या गाण्यावर थिकरताना दिसत आहे. आंटीचं वजन आणि तिच्या डान्स स्टेप्स पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आंटीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शरीराने जाडे असलेल्या लोकांना नाचणं कठीण असतं. मात्र आंटीच्या डान्स स्टेपमुळे डान्स शो मधील जजही प्रभावित झाले. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितही स्वत:ला आवरू शकली नाही.

नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत कौतुक केलं आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘आंटीचा जबरदस्त डान्स’. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘वाह क्या डान्स आहे, काय हिम्मत आहे’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aunty dance in reality show viral on social media rmt

Next Story
महागाईवरच्या प्रश्नामुळं संतापले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन; पत्रकाराला शिवी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी