Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही लोक त्यांची कला सुद्धा सोशल मीडियावर सादर करतात. कोणी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ शेअर करतात तर कोणी डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करतात. अनेक जण त्यांच्या जवळच्या लोकांच्या कला सुद्धा सोशल मीडियावर शेअर करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा त्याच्या आई गाणं गाण्यास सांगतो. त्याच्या आईचे गाणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (aunty sings a beautiful song tujhse naraz nahi zindagi watch amazing video )
काकूने गायलं सुरेख गाणं
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण त्याच्या आईला म्हणतो, “आज दिशाचं गाणं(दिशा ही एक युजर आहे. तिने हे गाणं गाण्यासाठी विनंती केली होती) त्यावर काकू म्हणतात, “अरे वाह” आणि गाण्यास सुरुवात करतात. काकू तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हू मै…” हे लोकप्रिय गाणं गाताना दिसतात. काकूंचा आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोक त्यांचे चाहते होतील.
हेही वाचा : Lady Macbeth: ममता बॅनर्जींना ‘लेडी मॅकबेथ’ची उपमा; कोण होती ही व्यक्ती? ‘लेडी मॅकबेथ इफेक्ट’ काय आहे?
या व्हिडीओवर अनेकांनी काकूंच्या गाण्याचं कौतुक केले आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप छान, तुम्हाला कोणाची नजर लागू नये” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर आवाज.. पण कायमच स्वयंपाकघरात का?..cute काकू ” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुमच्या साड्या मला खूप आवडतात” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी त्यांना काही गाणे गाण्याची विनंती केली आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
mom_tarana या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, तुझसे नाराज नहीं जिंदगी | आरडी बर्मन | गुलजार” या काकूंचे नाव मनीषा वरळ असून त्यांचा मुलगा त्यांचे अकाउंट हाताळतो आणि आईचे नवनवीन गाण्याचे व्हिडीओ शेअर करतो. त्यांच्या प्रत्येक गाण्यावर युजर्स कौतुकाचा वर्षाव करतात.