आजकाल कुठेही, कधीही काही होऊ शकतं सोशल मीडियावर अनेकदा थक्क करणारे व्हिडिओ समोर येतात ज्यामध्ये काही लोक असे काही तरी करतात ज्याची कोणी कल्पनाही करत नाही. मग तो एखादा जुगाड असो, एखादे काम असो. कोणत्याही कामात अडचण आली तरी हार मानत नाही त्यावर काही ना काही जुगाड शोधून काढतात. अनेकदा लोक एखादे काम करताना इतके वाहवत जातात की आपल्या जीवाची पर्वाही करत नाही. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ ज्यामध्ये एक महिला एका उंच इमारतीच्या बाल्कनीच्या टोकावर चढली आहे. ज्या कारणामुळे ती इथे चढली आहे ते पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका उंच इमारतीच्या एका बाल्कनीच्या कठड्यावर एक महिला उभी आहे. ही महिला जीव धोक्यात टाकून अशा ठिकाणी उभी राहिली आहे जिथून चुकूनही तिचा तोल गेला तर ती उंचीवरून खाली पडले आणि तिचा जीव गमावेल. हे माहित असूनही ही महिला बिनधास्तपणे तिथे उभे आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे एवढा जीव धोक्यात टाकून ही महिला कुंड्यांमध्ये लावलेल्या रोपांची काळजी घेत आहे. हा सर्व प्रकार त्याच इमारतीमधील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केला जो सध्या व्हायरल होत आहे.
contentkikamii नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काकू अशा वागत आहेत की, “थांब आधी मला गार्डनिंग (बागकाम) काम करू दे”
असे व्हिडिओ पाहून अनेकांना प्रश्न पडतो की,”लोक स्वत:च्या जीवाचा असा खेळ का करतात. आयुष्य म्हणजे खेळ नाही. आयुष्य एकदाच मिळते ते आनंदाने जगायचे असते पण लोक आयुष्याचे मोल विसरतात. असा निष्काळजीपणे वागून लोक स्वत:ची विनाकारण जीव गमावतात. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की,”डर के आगे जीत है और पिछे मौत” भितीचा समान करून पुढे गेला तर यश तुमचे आहे आणि मागे गेलात तर मृत्यू” दुसऱ्याने लिहिले की, “व्हिडीओ पाहून (भितीने) माझ्या पोटात गोळा आला.” तिसरा म्हणाला की, “काकूंनी छंद जोपसण्याचे जरा जास्तच मनावर घेतले आहे.” काहींनी व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला आहे.