scorecardresearch

भारताच्या पराभवानंतर चिमुकला ढसाढसा रडला, हृदयद्रावक VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आणि तमाम भारतीयांचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं.

After India's defeat, the little boy cried
भारताच्या पराभवानंतर चिमुकला ढसाढसा रडला. (Photo : X)

Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना काल अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि तमाम भारतीयांचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं. गेल्या दीड महिन्यापासून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर या पराभवामुळे आलेली निराशा स्पष्टपणे दिसत होती. अनेकांना तर कॅमेऱ्यासमोर आपल्या डोळ्यातील पाणी लपवणं कठीण झालं होतं.

मॅक्सवेलनं विजयी फटका मारला अन् भारतीय संघाच्या खेळाडूंना भावना अनावर झाल्या. यावेळी अनेकजण मैदानातही रडले, खेळाडूंनाच काय पण करोडो भारतीयांना देखील आपल्या डोळ्यातील अश्रू लपवणं कठीण झालं होतं. भारतीय संघाच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहते निराश झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे दु:ख पचवण कठीण झालेलं याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये लोक भारताचा पराभव झाल्यानंतर ढसाढसा रडताना दिसत आहेत. पण या सर्व व्हिडीओमध्ये एका चिमुकलीचा व्हिडीओ मात्र अनेकांना भावूक करत आहे. तिच्या डोळ्यातील पाणी पाहून भारतीयांना कालच्या पराभवामुळे किती दु:ख झालं आहे याचाअंदाज लावता येऊ शकतो.

India vs Australia Highlights Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup Highlights: विराट-राहुलचा तुफानी खेळी! ऑस्ट्रेलियाचा फ्लॉप शो, भारताचा सहा गडी राखून दणदणीत विजय
Asian Games 2023: Indian hockey team gave a crushing defeat to Singapore registered a spectacular victory of 16-1
Asian Games, Hockey: चक दे इंडिया! हॉकीत भारतीय संघाचा दबदबा कायम, एक-दोन नव्हे पुन्हा १६ गोल करत सिंगापूरचा उडवला धुव्वा
After Pakistan's defeat a YouTuber is taking a video of a Pakistani man's funny reaction
INDvPAK: “असं कोणी खेळतं का?” भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानचा चाहता ढसाढसा रडला…
IND vs SL: India captain Rohit Sharma crossed the 10 thousand runs mark in ODI career became the sixth Indian to do so
IND vs SL, Rohit Sharma: हिटमॅनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! भारताचा कर्णधार रोहित शर्मा झाला १० हजारी मनसबदार

हेही वाचा- IND vs AUS: फायनलचा थरार बघायला आलेल्या अनुष्का शर्माच्या ड्रेसची पुन्हा चर्चा; पाहा वर्ल्ड कप लूकची किंमत काय?

शिवाय हा व्हिडीओ पाहून अनेकजण हे दृश्य पाहू वाटेना असं म्हणत आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकला ढसाढसा रडताना दिसत आहे. यावेळी त्याची आई त्याला बाळा रडू नको असं सांगताना दिसत आहे. यावेळी ती म्हणते, “टेनिसमध्येही असंच घडतं ना, रडू नको बाळा” शिवाय यावेळी ही महिला मुलाच्या डोळ्यातील अश्रू पुसताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “हे पाहवत नाहीये”

दरम्यान, असाच एक व्हिडीओ आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मुलीचाही व्हायरल होतोय. ज्यामध्ये त्यांची मुलगी आरोहीला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे. यावेळी ती टीव्हीसमोर बसून ढसा ढसा रडत असल्याचं दिसत आहे. शिवाय यावेळी तिचे कुटुंबीय तिला समजावण्याचा, धीर देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australia won world cup toddler cries after indias defeat heartbreaking video will make your eyes water too jap

First published on: 20-11-2023 at 10:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×