Inspiring Auto Driver Message: आजच्या सोशल मीडियाच्या जगात दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून आपण हसतो, काही पाहून आश्चर्यचकित होतो, तर काही थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड चर्चेत आहे. कारण- या व्हिडीओमध्ये एका साध्या रिक्षाचालकाने रिक्षावर अशी एक ओळ लिहिल्याचे दिसतेय, जी प्रत्येकाचं मन जिंकून घेते.

आपण प्रवास करताना अनेकदा वेगवेगळे अनुभव घेतो. काही अनुभव क्षणिक असतात, तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. या व्हायरल व्हिडीओमध्येही असाच एक खास क्षण कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एका रिक्षाचालकाने आपल्या सीटच्या मागे एक साधी, पण अत्यंत प्रभावी ओळ लिहिली आहे. ही ओळ इतकी मनाला भिडणारी आहे की, ती वाचल्यानंतर प्रत्येक जण थोडा वेळ विचारात पडतो.

त्या रिक्षाचालकाच्या सीटच्या मागे लिहिले आहे – “मीही कोणाचा तरी वडील आणि भाऊ आहे. तुमची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कृपया न घाबरता येथे बसा.”

ही ओळ वाचताच अनेकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. विशेषतः महिलांसाठी हा संदेश खूप दिलासादायक ठरतो. आजच्या काळात महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना, एका साध्या रिक्षाचालकाने दिलेला हा संदेश समाजासाठी एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या रिक्षाचालकाचे कौतुक केले आहे. काहींनी तर म्हटले, अशा ऑटोमधूनच प्रवास करावा, असं वाटतं.” तर काहींनी या संदेशाचे प्रत्येक वाहनचालकाने अनुकरण करावे, असेही मत व्यक्त केले आहे.
एका छोट्याशा वाक्याने किती मोठा बदल घडविता येतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

हा हृदयस्पर्शी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘star._.belt’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी त्याला पसंती दिली आहे. कमेंट्समधूनही लोकांनी त्या रिक्षाचालकाचे मनापासून कौतुक केले आहे. काहींनी लिहिले आहे, “हा व्हिडीओ पाहून मन आनंदित झालं,” तर काहींनी म्हटले, “अशा विचारसरणीची समाजाला आज खूप गरज आहे.”

या व्हिडीओने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, मोठेपणा हा पैशात नसतो; तर विचारांत असतो. सुरक्षितता आणि विश्वास यांना सर्वांत जास्त महत्त्व द्यायला हवं, असा महत्त्वपूर्ण संदेश एका सामान्य माणसाने त्याच्या कृती आणि शब्दांतून समाजाला दिला आहे.

खरोखरच, एका छोट्याशा वाक्याने इतक्या लोकांची मने जिंकता येतात, हे पाहून आपणही थक्क होतो. आता तुम्हालाही इच्छा झाली असेल ना की, आपणही रिक्षामधून प्रवास करावा म्हणून.

येथे पाहा व्हिडीओ