scorecardresearch

रिक्षावाल्याचा नादखुळा! ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर काय केलं पाहा; Video झाला Viral

दरम्यान हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कदाचित सलमान खान ही रिक्षा चालवत असावा अशा मजेशीर कमेंट केल्या आहेत.

रिक्षावाल्याचा नादखुळा! ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर काय केलं पाहा; Video झाला Viral
रिक्षावाल्याचा नादखुळा (फोटो: संग्रहित)

मोठमोठ्या फॉर्म्युला रेसिंग चालकांना लाजवेल असं तुफान ड्रायव्हिंग भारतातील रिक्षाचालक करतात असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. अक्षरशः चाळणी झालेल्या रस्त्यातून वाट काढत, सुसाट वेगाने रिक्षा चालवत असताना आतल्या पॅसेंजरला एक रोलर कोस्टर राईडचा अनुभव देणं हे रिक्षा चालकांचं कमालीचं कसब म्हणता येईल. जेव्हा मोठमोठ्या फॅन्सी गाड्या ट्रॅफिक मध्ये अडकून पडतात तेव्हा विचारही करता येणार नाही अशा मार्गाने कट मारून वाहनांची कोंडी सोडवणारा रिक्षा चालक अनेक नोकरीदारांचे लेटमार्क वाचवण्याचं काम करतो. अशाच एका व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरु आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणार व्हिडीओ मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार जवळील एका पुलावर काढण्यात आल्याचे समजत आहे. अगदी सामान्य वाटणाऱ्या या व्हिडिओमध्ये रस्ता ओलांडण्यासाठी बनवलेल्या एका ब्रिजवर चक्क अचानक रिक्षाची एंट्री होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा पादचारी पूल आहे म्हणजेच त्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजूला जिना आहे, मग हा रिक्षावाला नेमका वर पोहचलाच कसा हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. एखाद्या ऍडव्हेंचर पार्क मध्ये असणाऱ्या राईड प्रमाणे हा रिक्षाचालक बिनधास्त ड्रायव्हिंग करत आहे.

पहा रिक्षाचालकाचा Viral Video

दरम्यान हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कदाचित सलमान खान ही रिक्षा चालवत असावा अशा मजेशीर कमेंट केल्या आहेत. खरंतर दबंग खान म्हणजेच सलमानला सुद्धा रिक्षातून प्रवासाची फार आवड आहे. अनेकदा सलमान रिक्षातून प्रवास करताना स्पॉट झाला आहे, काही महिन्यांपूर्वी तर पनवेल मध्ये सलमान स्वतः रिक्षा चालवतानाचा सुद्धा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Video: बुलेटवरून Swag Entry घ्यायला निघाली नवरी.. पुढे असं झालं की रस्त्यावरचे लोक सुद्धा बघत बसले

यापूर्वी सुद्धा अनेक रिक्षा चालकांचे असे थक्क करून टाकणारे व्हिडीओ समोर आले होते मात्र यावेळेस व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये रिक्षा चालक वर गेला कसा हा प्रश्न नेटकऱ्यांना बुचकळ्यात टाकून गेला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हे कोडं सोडवता येतंय का सांगा..

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या