scorecardresearch

Video: चालकाने ऑटोरिक्षाच्या छतावरच बनवली बाग, गरमी पासून वाचवण्यासाठी केला देशी जुगाड

या कडक उन्हापासून दिलासा देण्यासाठी एका रिक्षाचालकाने अनोखा मार्ग शोधला आहे. त्याने त्यांच्या ऑटोच्या छतावर संपूर्ण बाग बनवली आहे.

rickshaw garden on top
रिक्षाचालकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. (फोटो: @AFP )

देशातील अनेक राज्यात उष्णतेच पार वाढत आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) आजकाल एवढी उष्णता आहे की जिकडे पाहावे तिकडे फक्त घामाने भिजलेले लोक दिसतील. पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत लोक कुठेही जाताना आवर्जून रिक्षा किंवा अन्य वाहनांचा वापर करतात. या कडक उन्हापासून (Summer) दिलासा देण्यासाठी एका रिक्षाचालकाने अनोखा मार्ग शोधला आहे. त्यांच्या ऑटोच्या छतावर त्यांने संपूर्ण बाग (roof top garden on rickshaw) बनवली आहे.

कधी सुचली ही कल्पना?

दिल्लीच्या रस्त्यावर धावणाऱ्या सर्व ऑटोरिक्षांपैकी महेंद्र कुमार यांची ऑटो अतिशय खास आहे. कारण त्यांच्या ऑटोच्या छतावर त्यांनी बाग बनवली आहे. न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, ऑटोच्या छतावर बाग लावण्याची कल्पना महेंद्र कुमार यांना दोन वर्षांपूर्वी कडक उन्हाळ्यात आली होती. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी ऑटोच्या छतावर काही झाडे लावता येतील, असा विचार त्यांनी केला. रोपे लावल्यानंतर त्यांची ऑटोरिक्षा थंड राहते आणि लोकांना उन्हापासूनही आराम मिळतो, असे ते सांगतात.

(हे ही वाचा: Viral Video: हवा भरतानाच जेसीबीचा टायरच फुटला अन्….; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद)

ऑटोमध्ये आहेत दोन पंखेही

महेंद्र कुमार यांच्या ऑटोमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर दोन छोटे पंखेही लावण्यात आले आहेत. ते म्हणतात की, जो कोणी त्याच्या रोपांनी लावलेल्या ऑटोमध्ये बसतो याचं कौतुक करतो. एवढेच नाही तर त्याचे सहकारी ऑटोरिक्षा चालकही त्याच्याकडून अशा प्रकारे झाडे वाढवण्याच्या टिप्स घेत असतात.

(हे ही वाचा: हा इम्रान खान आहे का? ‘जाने तू या…जाने ना’ अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण!)

(हे ही वाचा: वडिलांनी लग्नासाठी पाठवलेल्या मुलाला मुलीने दिली ‘ही’ खास ऑफर; चॅटची होतेय सर्वत्र चर्चा)

बनवला नॅचरल एसी

महेंद्र कुमार सांगतात की, ऑटोच्या छतावरील ही झाडे त्यांच्यासाठी नैसर्गिक हवा कंडिशनप्रमाणे काम करतात. पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Auto rickshaw driver make roof top garden to beat the heat in delhi ttg

ताज्या बातम्या