Viral Video : सोशल मीडियावर रिक्षाचालकाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. ऑटो चालक कधी डान्स करताना तर कधी गाणी म्हणताना दिसून येतात. कधी ते त्यांच्या अनोख्या रिक्षेमुळे तर कधी त्यांच्या बिनधास्त स्वभावामुळे चर्चेत येतात. अनेकदा रिक्षाच्या मागे लिहिलेले मेसेज सुद्धा व्हायरल होतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रिक्षाचालकाने एक असा मेसेज लिहिला आहे ज्यामुळे त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Auto Rickshaw Driver Wins Hearts by Offering Free Rides to Pregnant Women Video Goes Viral on Social Med)

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : PHOTO: पुणेकरांचा नाद करायचा नाय! पेट्रोल पंपावर लिहली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही म्हणाल “जशास तसं”

रिक्षाचालकाने जिंकले मन

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक ऑटोरिक्षा दिसेल. या रिक्षेच्या आत रिक्षाचालकाने एक मेसेज लिहिला आहे. पांढऱ्या कागदावर रिक्षाचालकाने लिहिलेय, “गर्भवती महिलांना कोणताही चार्ज लागणार नाही” म्हणजेच हा रिक्षाचालक गर्भवती महिलांना मोफत सेवा देतोय. हा मेसेज वाचून कोणीही थक्क होईल आणि या रिक्षाचालकाचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : रस्त्यात तिला अडवलं अन्…, आधी कानाखाली मारलं मग जमिनीवर आदळलं, दुचाकीस्वाराने केला महिला कॉन्स्टेबलवर हल्ला! पाहा धक्कादायक VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : ती पोहत होती अन् अचानक शार्क माशानं पाय पकडला; रक्तस्त्राव आरडाओरडा अन्…पाहून तुमचाही थरकाप उडेल

atoz_jabalpur या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असेल. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मातृशक्ती प्रति भावाच्या विचाराला सलाम” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”या मुलाने गरीबी पाहिली आहे.गरीबी काय असते आईसाठी” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात माणुसकी” एक युजर लिहितो, “आतापर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडीओ” तर एक युजर लिहितो, “मला खूप अभिमान वाटतो.” या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक युजर्सनी रिक्षाचालकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader