scorecardresearch

Premium

Video: हाताने रिक्षा चालवली तर पायाने मर्सिडीज; पुण्यातील भन्नाट ड्रायव्हिंगचा व्हिडिओ Viral का होतोय एकदा पाहाच

पुण्यात रिक्षेच्या मदतीनं धावली आलिशान मर्सिडीज…व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल

pune mercedes auto rickshaw video
photoO social media)

Pune Viral Video: गाडीतील इंधन अचानक रस्त्यावर संपल्यावर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडते. त्यात जर पेट्रोल पंप जवळ नसेल तर मग विचारायलाचं नको. तसंच रस्त्यावर आजूबाजूला प्रत्येकजण घाईत असतो त्यामुळे त्यांच्याकडुन मदतीची अपेक्षा मिळणे देखील कठीण असते. मात्र पुणे याला अपवाद आहे. जे कुठेच पाहायला मिळणार नाही ते पुण्यात मात्र नक्की पाहायला मिळेल. सध्या पुण्यातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एक मर्सिडीज कारला चक्क रिक्षेची मदत घ्यावी लागली.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील हा व्हिडीओ आहे. पुण्यातील एका रिक्षाचालकाने इंधन संपत आलेल्या मर्सिडीजची मदत केली आहे. खरं तर एक आलिशान मर्सिडीज कार इंधन संपल्याने भररस्त्यातच बंद पडली. मात्र एका रिक्षाचालकाने ही मर्सिडीज थांबू दिली नाही. त्याने हाताने रिक्षेचं स्टेअरिंग धरत रिक्षा चालू ठेवली तर त्याचवेळी जवळील मर्सिडीजला पायाने धक्का दिला त्यामुळे बंद पडलेली मर्सिडीज रस्त्यावर धावू लागली.

alia bhatt and ranbir kapoor daughter raha v
Video: ११ महिन्यांनंतर आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लेकीची पहिली झलक, पाहा राहाचा व्हिडीओ
Bird removes bluetooth earbuds from journalist ears and fly away
लाईव्ह रिपोर्टिंग करताना पक्षाने केली पत्रकाराबरोबर गंमत… मजेशीर Video व्हायरल
Video of woman dancing
“दिल धड़के दर्द कलेजे में” गाण्यावर मेट्रोत थिरकली तरुणी, डान्स पाहून सपना चौधरीलाही विसरून जाल
Mumbai Police officer playing dhol tasha at ganpati aagman old video viral of Mumbai Ganeshotsav
Mumbai Police : मुंबई पोलिसांची कुठेही तोड नाही! गणपती आगमनाच्या वेळी पोलिसाने वाजवला ढोल-ताशा; जुना व्हिडीओ व्हायरल

( हे ही वाचा: ५२ वर्षीय महिलेने २१ वर्षीय तरुणाशी केलं लग्न; म्हणाली “मी याला तीन वर्ष…”)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: मिठाईवरून भर लग्नमंडपात वधू आणि वराचे जोरदार भांडण; स्टेजवरच एकमेकांना मारत सुटले अन…)

हा व्हिडिओ पुण्यातील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. पुण्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या फक्त पुण्यातच पाहायला मिळतात. ही घटना देखील त्यापैकीच एक आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. तर अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Auto rickshaw helping mercedes in pune koregaon park video goes viral on social media gps

First published on: 16-12-2022 at 12:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×