टेस्ला अर्थात स्पेसएक्स ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. या कार बद्दल आणि तिचा मालक एलन मस्क बद्दल सोशल मीडियावर रोज काही ना काही चर्चा असतेच. या गाडीचे व्हिडीओ , फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. टेस्ला कारची  ऑटोपायलट सिस्टिमबद्दल तर नेहमीच चर्चा रंगलेली असते. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपायांसाठी ओळखली जाणारी, कंपनी सतत विकसित होणाऱ्या ऑटोपायलट सिस्टिम तंत्रज्ञानाकडे लक्ष वेधून घेते. याच ऑटोपायलट सिस्टिमने एका चालकाचे प्राण वाचवले आहेत आणि याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअरही केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय झालं?

एक २४ वर्षीय नॉर्वेजियन माणूस टेस्ला वाहन चालवताना नशेत होता. त्याला नशेत असल्यामुळे गाडी चालवता येत न्हवती आणि एका क्षणी त्याने गाडीवरचा पूर्णच ताबा सोडून दिला. सुदैवाने त्याने कारच्या ऑटोपायलट सिस्टमला ही गोष्ट समजली आणि सिस्टिमने गाडीचा ताबा घेतला. यामुळे कोणताही जीवघेणा अपघात टळला, असे या व्हिडीओमधून दिसून येत आहे. हा व्हिडीओ रस्त्यावर दुसरी गाडी चालवणाऱ्या एकाने बनवला आहे. नॉर्वेतील एका हायवेवर घडलेली ही घटना आहे. ड्रायव्हर प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कार पूर्णपणे थांबली. तसेच  आपोआप आपत्कालीन सेवांना सतर्क करणाऱ्यासाठी धोक्याच्या दिवेही सिस्टिमने चालू केले.

चालकावर पोलिसांची कारवाई

ईस्टर्न पोलीस डिस्ट्रिक्टच्या अधिकृत ट्विटर पोस्टनुसार, ड्रायव्हरने गाडीचा ताबा पूर्णपणे सोडल्यावर ऑटोपायलट सिस्टिम सक्रिय झाली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला चालक मद्यधुंद होता, जरी त्याने गाडी चालवत असल्याचे नाकारले तथापि, व्हिडीओ पुरावा असे दर्शवित नाही. त्याचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला असून त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

ऑस्टिन टेस्ला क्लबने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर नेटीझन्सने आपल्या प्रतिकिया नोंदवल्या आहेत. एक युजर म्हणतो की, “गाडीला जे करायला पाहिजे तेच बरोबर गाडीने केलं आहे. गाडी हळू झाली, धोक्याच्या दिवेही सुरु केले आणि ड्रायव्हरला धोक्याची सूचना काही वेळा देऊन गाडी थांबली.” तर “पोलिसांनी सागितलं की गाडी चालक नशेत होता. टेस्लाने चालकाचे नाही तर स्वतःचे प्राण वाचवले आहे.” अशी मज्जेशीर प्रतिकियासुद्धा अन्य युजरने दिली आहे.

कारमध्ये ऑटोपायलट सिस्टिम नसती तर काय घडले असते याची कल्पना करणे कठीण नाही.

More Stories onकारCar
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Autopilot saves life of a drunk tesla driver who passed out at the wheel on a highway ttg
First published on: 04-08-2021 at 10:06 IST