शोएब मलिक आणि तू लग्न करणार आहात का? सानिया मिर्झाच्या संसारात वादळ उठवणारी अभिनेत्री म्हणाली, "तो त्याच्या पत्नीबरोबर..." | Ayesha Omar Reacts To Queries About Marrying Sania Mirza Beau cricketer Shoaib Malik scsg 91 | Loksatta

शोएब मलिक आणि तू लग्न करणार आहात का? सानिया मिर्झाच्या संसारात वादळ उठवणारी अभिनेत्री म्हणाली, “तो त्याच्या पत्नीबरोबर…”

मागील काही दिवसांपासून या अभिनेत्रीचं नाव चर्चेत असून या अभिनेत्रीमुळेच शोएब-सानियाच्या संसारामध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा

शोएब मलिक आणि तू लग्न करणार आहात का? सानिया मिर्झाच्या संसारात वादळ उठवणारी अभिनेत्री म्हणाली, “तो त्याच्या पत्नीबरोबर…”
मागील काही दिवसांपासून ही अभिनेत्री सातत्याने चर्चेत (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या संसारात मिठाचा खडा पडल्याची बातमी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. २०१० साली लग्नबंधनात अडकलेल्या सानिया आणि शोएबने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र या बातम्यांवर अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही. असं असतानाच या दोघांमधील वादाच्या केंद्रस्थानी पाकिस्तानी अभिनेत्री आयशा ओमार असल्याच्या बातम्याही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून आयशाबद्दल उलट सुलट बातम्यांचं पेव फुटलेलं असतानाच शोएब आणि सानियाच्या नात्यामध्ये आयशामुळे कटुता आल्याच्या मुद्द्यावर तिनेच प्रतिक्रिया नोंदवली आहे.

शोएबबरोबर तुझं काही नातं आहे का यासंदर्भात चाहत्यांनी सोशल मीडियावरुन आयशाला प्रश्न विचारला असता तिने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. आम्ही फक्त मित्र आहोत, असंही आयशाने सांगितलं. आयशा आणि शोएबचं बोल्ड फोटोशूट सानियाबरोबरच्या नात्यामध्ये फूट पाडण्यासाठी कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. २०२१ मध्येच हे फोटोशूट झालं होतं. या फोटोशूटमधील फोटो सार्वजनिकपणे समोर आल्यानंतर त्यावरुन शोएब आणि सानियामध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. या फोटोशूटबद्दल एका मुलाखतीमध्ये शोएबने आयशाचं कौतुक केलं होतं. तिने या फोटोशूटसाठी मला फार मदत केल्याचं शोएबनं सांगितलं होतं.

शोएब आणि आयशाचं प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या चर्चांवर आयशाने तिच्याच एका पोस्टवर कमेंटमधून प्रतिक्रिया नोंदवली आहे. चाहत्याने याचसंदर्भात तुम्हा दोघांचा लग्नाचा विचार आहे का? या प्रश्नाला आयशाने उत्तर दिलं आहे. “अजिबात आमच्यात तसं काहीही नाही. त्याचं (शोएबचं) लग्न झालेलं आहे आणि तो त्याच्या पत्नीबरोबर फार आनंदात आहे. मला त्या दोघांबद्दल फार आदर वाटतो. शोएब माझा चांगला मित्र आहे. आम्ही कायम एकमेकांच्या भल्याचा विचार करतो. जगात अशीही नाती अस्तित्वात असतात,” असं आयशाने म्हटलं आहे.

याच महिन्याच्या सुरुवातीला एएनआय या वृत्तसंस्थेनं सानिया दुबईमधील तिच्या घरी राहायला गेल्याचं वृत्त दिलं होतं. यापूर्वी ती शोएबबरोबर दुबईतील पाम जुमेराह येथील बंगल्यामध्ये वास्तव्यास होती. मात्र या वृत्तानंतर शोएब आणि सानिया एकत्र एक कार्यक्रम होस्ट करत असल्याची बातमी आली आणि त्यांच्यामधील मतभेद हे केवळ प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली वावटळ असल्याची चर्चा रंगू लागली.

सानिया आणि शोएबला इजहान नावाचा चार वर्षांचा मुलगा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 10:58 IST
Next Story
फोटोग्राफीच्या नादात रविना टंडन अडचणीत? व्याघ्र प्रकल्पातील ‘तो’ Video समोर आल्यानंतर तपास सुरु; जाणून घ्या घडलंय काय