बाप रे बाप! एवढा मोठा अजगर तुम्ही कधी पाहिला नसेल, VIRAL VIDEO पाहून उडेल थरकाप…

या व्हायरल व्हिडीओमध्ये जे दिसत आहे, यावर तुम्हाला विश्वास ठेवणं कठीण होईल. या लांबलचक आणि जाडजूड अजगराला पाहून अनेकांची बोबडी वळली आहे. सोशल मीडियावर या विशालकाय अजगराचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

azgar-ka-video-python-video-viral
(Photo: Instagram/ helicopter_yatra_ )

सोशल मीडियाच्या जगात कधी व्हायरल होईल हे कोणीही सांगू शकत नाही. कधी कधी असे व्हिडीओ इथे बघायला मिळतात की ते पाहून हसू आवरणं अवघड होतं. तर कधी काही व्हिडीओ पाहून डोळे पाणावतात. सध्या असाच एक व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका विशालकाय अजगराचा आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये जे दिसत आहे, यावर तुम्हाला विश्वास ठेवणं कठीण होईल. अल्पावधीतच हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून नेटिझन्सही त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. या लांबलचक आणि जाडजूड अजगराला पाहून अनेकांची बोबडी वळली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका जंगलातला असल्याचं दिसतंय. जंगलातल्या एका नदीच्या काठावर जवळपास १०० फूट लांबीचा विशालकाय अजगर अढळून आला आहे. या व्हिडीओ आणखी निरखून पाहिल्यास अजगराची लांबी यापेक्षा कितीतरी जास्त असल्याचं दिसतंय. अनेक टन वजनाचा हा अजस्त्र अजगर नदीच्या काठावर आरामात पडलेला दिसतोय. मात्र, हा महाकाय अजगर व्हिडीओमध्ये कोणतीही आक्रमकता दाखवताना दिसून येत नाहीय.

सोशल मीडियावर या विशालकाय अजगराचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे आणि कधीचा आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र नेटिझन्स हा व्हिडीओ पाहून अॅमेझॉनच्या जंगलातला हा व्हिडीओ असावा असा अंदाज लावण्यात येतोय. या व्हिडीओवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आता हेअर ड्रायर विकत घेण्याची गरज नाही! हा देसी जुगाड पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल What An Idea !

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न मंडप सोडून नवरी पोहोचली जीममध्ये… ब्रायडल ड्रेसमधला तिचा वर्कआऊट पाहून नेटकरी हैराण

helicopter_yatra_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ९५ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच साडे तीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या अजस्त्र अजगराच्या व्हिडीओ लाईक करत कमेंट्स सेक्शनमध्ये आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.

पण हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडीओबाबत शंका व्यक्त केलीय. काही युजर्सनी तर या व्हिडीओला कॅमेराची कमाल असल्याचं सांगितलं आहे. या व्हिडीओच्या सत्यताबाबत युजर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्याही हृदयाचे ठोके वाढतील. विशेषत: ते लोक घाबरतील, जे सापाचे नाव ऐकताच थरथर कापायला लागतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांनी इमोटिकॉनद्वारे त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Azgar ka video python video sanp ka video google trends trending video havent seen such giant python see what happened next omg video went viral prp