Baba Vanga Bhavishyavani on Smartphone : बाल्कनची नॉस्ट्रॅडॅमस म्हणून प्रसिद्ध बाबा वेंगा यांच्या भाकितांवर जगभरातील लोक विश्वास ठेवतात. बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी करणारी अनेक भयानक भाकिते मांडली आहेत. जगाचा अंत कधी होणार हेही त्यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितले आहे. दुसरे महायुद्ध, चेकोस्लोव्हाकिया व युगोस्लाव्हियाचे विभाजन, चेर्नोबिल अणू दुर्घटना, स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख अशी अनेक भाकिते त्यांनी केलीली होती, जी नंतर खरी ठरली. अशा परिस्थितीत बाबा वेंग यांची एक भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
बुल्गेरियातील प्रसिद्ध नेत्रहीन बाबा वेंगा यांनी दशकांपूर्वी स्मार्टफोनसारख्या उपकरणामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत इशारा दिला होता. आज हा इशारा खरा होताना दिसत आहे. स्मार्टफोनपेक्षा जास्त वापर लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांसाठी गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. बाबा वेंगाने एका अशा भविष्याची कल्पना केली आहे जिथे लोक छोट्या इलेक्टॉनिक उपकरणांवर जास्त अवलंबून असती आणि कित्येक आजारांचा सामना करतील त्यांनी सांगितलेले हे (सायलंट किलर) उपकरण स्मार्टफोन असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
बाब वेंगा यांनी सांगितले होते की, भविष्यात छोटे उपकरण मानवाची वर्तणूक आणि मानसिक स्वास्थला महत्त्वपूर्णरित्या बदलले. सुरुवातीच्या काळात आयुष्य जगणे सोपे करण्यासाठी आणलेले हे तंत्रज्ञान नंतर मानवाच्या कल्याणासाठी मोठा धोका ठरू शकते. त्यांनी तंत्रज्ञानाने धोक्याचा गंभीर इशारा दिला होता. आज स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे डोळे आणि झोपेसंबधित समस्या होत असल्याचे दिसत आहे.
स्मार्टफोनचे व्यसन लहान मुले आणि प्रोढांवर कसा प्रभाव टाक आहेत? ( How mobile addiction is affecting children and adults alike)
स्मार्ट फोनच्या वाढत्या वापरामुळे स्क्रिन टाईम वाढत आहे. ज्यामुळे सर्वच वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी हे धोकादायक आहे. हे चित्र बाब वेंगा यांच्या इशाऱ्याच्या भविष्यवाणीचे प्रतिबिंब आहे.
लहान मुले आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याला निर्माण होतोय धोका(Children and teenagers at risk)
नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्टिंग ऑप चाईल्ड राईट ((NCPCR)भारतातील अहवालानुसार, जवळपास २४ टक्के मुले रात्री स्मार्टफोनशिवाय झोपत नाही.या सवयीमुळे झोपेच्या चक्रात अडथळा येतो, एकाग्रता बिघडते आणि दीर्घकालीन शिकण्यात अडचणी येऊ शकतात. संशोधनामध्ये जास्त वेळ स्मार्ट फोन वापरणाऱ्या मुलांमध्ये नैराश्य, चिंता जाणवू शकते आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतातय तसेच अधिक काळ स्मार्टफोन वापरल्याने शारीरिक हालचाल कमी होते आणि समाजात वावर कमी होतो जे त्यांच्या एकूण कल्याणावर परिणाम करते.
स्मार्टफोनचा वापराने प्रौढांमध्ये वाढतोय ताण (The toll on adults)
स्मार्टफोन वापराचे दुष्परिणाम फक्त लहानापर्यंत मर्यादीत नाही आणि प्रौढ लोकांनाही स्मार्टफोचे व्यसन लागले आहे. सतत मोबाईलवर व्हिडिओ पाहात स्क्रोल करणे, रात्री उशीरापर्यंत काहीतरी सर्च करणे,
सोशल मीडियाचा अतिवापरामुळे शारीरिक ताण वाढतो डोळ्यांवर ताण येतो, मानेवर ताण येतो आणि झोपेमध्ये अडथळा येतो. ताण येणे, लक्ष देण्याचा काळ कमी होणे, एकटेपणाची भावना जाणवे, एकटे राहणे यामुळे मानसिक आरोग्याशी सबंधित समस्याही दिसून येतात. अनेकांच्या नातेसंबधवार हा परिणाम होतो.
बाबा वेंगा कोण होत्या?
१९११ मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा होते. बाबा वेंगा यांच्या मृत्यूनंतरही जगभरातील लोक तिच्या भविष्यवाणीने प्रभावित होत आहेत. बाबा वेंगा यांनी दावा केला की, वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली आणि नंतर त्यांना भविष्यवाणी करण्याची शक्ती मिळाली. वेंगा यांनी आपले बहुतेक आयुष्य बल्गेरियामध्ये व्यतीत केले आणि ‘बाल्कनची नॉस्ट्रॅडॅमस’ म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. जागतिक घडामोडींच्या भाकितांसह त्यांनी स्वतःच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती.
बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी करणारी अनेक भयानक भाकिते मांडली आहे. जगाचा अंत कधी होणार हेही तिने आपल्या भविष्यवाणीत सांगितले आहे. दुसरे महायुद्ध, चेकोस्लोव्हाकिया व युगोस्लाव्हियाचे विभाजन, चेर्नोबिल अणू दुर्घटना, स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख अशी अनेक भाकिते तिने केली होती, जी नंतर खरी ठरली.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, २०२५मध्ये मानवतेचा विनाश सुरू होईल. एकानंतर एक विनाशकारी घटनापासून याची सुरुवात होईल. २०२५मध्ये यूरोपमध्ये एक भयानक संघर्ष सुरू होईल ज्यामुळे मोठे नुकसान होईल आणि या खंडातील मोठ्या लोकसंख्येवर त्याचा वाईट परिणाम होईल.