Baby Girl Dance Viral Video : सोशल मीडियाच्या दुनियेत रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडीओ थेट काळजाला भिडतात, तर काही आपल्या चेहऱ्यावर अलगद हसू आणतात. सध्या असाच चिमुकलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुमचीही बालपणीची एखादी आठवण जागी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण- लहानपणी तुम्हीदेखील तिच्यासारखं स्वत:च गाणी गुणगुणत नाचला असाल. या व्हिडीओत चिमुकली ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर असे काही नखरेल ठुमके देत आहे की, ते पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक गोंडस चिमुकली आपल्याच मस्तीत नाचताना दिसत आहे. ती केवळ नाचतच नाहीय, तर आपल्या बोबड्या बोलात ती गाण्याचे बोलही गुणगुणत आहे. तिची ती अदा, हातांच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील गोड हावभाव पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. आधी ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर नखरेल अदा दाखवीत नाचतेय. त्यानंतर ती ‘एक नंबर तुझी कंबर’ हे दुसरं गाणंही गुणगुणत नाचू लागते. गाणं गात नाचताना तिला दम लागतोय; पण तरीही ती काही नाचायची किंवा गायची थांबत नाही. बोबड्या बोलातील गाण्याचे शब्द स्पष्ट नसले तरी तिच्या आवाजातील गोडवा सर्वांना भावतोय.
चिमुकलीचा डान्स पाहून तुमच्या चेहऱ्यावर नकळत येईल हसू (Baby Girl Lal Lal Color Chi Bangadi Dance Video)
मोठ्या डान्सरलाही लाजवेल अशा आत्मविश्वासाने ही चिमुरडी ठुमके लगावतेय. व्हिडीओ पाहताना तुमच्या चेहऱ्यावर नकळत हसू येईल इतकी निरागसता त्यात आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी “किती गोड!”, “नजर नको लागायला” अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
चिमुकलीच्या या डान्सचा व्हिडीओ @aarushi_gholap नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक एकापेक्षा एक सुंदर कमेंटस करतातय. एकाने लिहिले की, शब्दांत व्यक्त करता येणार नाही बाळा तुझं कौतुक, तू खूप छान आहेस. दुसऱ्याने लिहिले की, अशी एक लक्ष्मी प्रत्येक घरात पाहिजे. तिसऱ्या एकाने लिहिले की, चिमुकलीचा डान्स एआय व्हिडीओंपेक्षा सुंदर आहे. आता,ची परिस्थिती पाहता एका ताईने कमेंटमधून सुंदर सल्लाही दिला आहे, तिने लिहिले की, खूप छान केलं बाळा; पण त्चयाबरोबर आताच जग बघता, तुला तुझ्या संरक्षणासाठी लाठीकाठी, तलवारबाजी, कराटेपण शिकायचेत. कला असली, तर ती जपली पाहिजे; पण त्याचबरोबर स्वतःलासुद्धा जपलं पाहिजे.
