कृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे स्मरण करून भारतात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. हा दिवस देशात विविध प्रकारे साजरा केला जातो, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि आरती यांचा समावेश आहे. प्रिय कान्हाला त्याच्या आवडीचे पदार्थ दिले जातात आणि पारंपारिक रास लीला खेळ खेळले जातात. मुले सहसा राधा आणि कृष्णाची वेशभूषा करतात, त्यांच्या जीवनातील दृश्ये पुन्हा साकारतात आणि कृष्णाच्या जन्माच्या कथा कधीकधी नृत्या द्वारे वर्णन केल्या जातात किंवा चित्रित केल्या जातात. लोक कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करत असताना, नुकत्याच घडलेल्या एका घटनेने अनेकांना थक्क केले आहे. कृष्णाच्या जन्माच्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कृष्णाच्या जन्माच्या आठवणींना उजाळा देणारी घटना चर्चेत

एकीकडे कृष्णजन्माची कथा सांगितली जात आहे, सादर केली जात असताना दुसरीकडे गुजरातमध्ये कृष्णजन्माची प्रसंगाची आठवण करून देणारी घटना घडली आहे. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. गुजरातमध्ये पुरस्थिती निर्माण झाल्याने कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यातून एका चिमुकल्याला वाचवताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याप्रमाणे वासूदेव यांनी मुसळधार पावसामध्ये टोपलीत ठेवून श्री कृष्णाला यमुना नदी ओलांडली होती त्याचप्रमाणे चिमुकल्या बाळाला वाचवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. चिमुकल्याला डोक्यावर घेऊन हा तरुण पाण्यातून बाहेर येत आहे. त्यांना वाचवण्यासाठी बचावपथकाचे काही लोकही उपस्थित असल्याचे दिसते आहे. जसे वासुदेव यांनी बाळ कृष्णाला पकडले होते तसेच या तरुणाने बाळाला पकडले आहे ज्यामुळे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु दाटले आहेत कारण हा प्रसंग सर्वांना कृष्ण जन्माची आठवण करून देत आहे.

हेही वाचा –‘मैया यशोदा’ गाण्यावर राधा कृष्णच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी केले गोंडस नृत्य,Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

इंस्टाग्रामवर, naad_kirtanacha या पेजरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” सध्या देशभरात कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला साजरा केला जात आहे. या सगळ्यात गुजरामधून एक मन जिंकणारा व्हिडिओ समोर येत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला वासुदेव श्रीकृष्णाला मुसळधार पावसात टोपलीत घेऊन जात आहेत या प्रसंगाची आठवण येईल. व्हायरल होणारा व्हिडिओ गुजरातमधील कलोल शहरातील आहे. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलंय. अशा पूरस्थितीत एका चिमुकल्याला कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यातून वाचवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना कृष्ण जन्माची आठवण होत आहे.”

हेही वाचा – ११० वर्ष जुनी परंपरा! ‘या’ गावात उडी मारून डोक्याने फोडली जाते दहीहंडी, Video होतोय Viral

भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची आख्यायिका

भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावेळची एक आख्यायिका सांगितले जाते की, कंसाने आपली बहीण देवकी हिचा वासुदेवाशी विवाह करून दिला. या विवाहानंतर तिला रथात बसवून तो निरोप देत होता. त्यावेळी एक आकाशवाणी झाली, की, देवकीच्या आठव्या मुलाच्या हातून कंसाचा वध होईल. त्यानंतर घाबरलेल्या कंसाने वासुदेवाला आणि देवकीला तुरुंगात टाकले. त्यानंतर कंसाने देवकीच्या एक-एक करून सातही वध केला. म्हणून आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वासुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र नंद याच्या स्वाधीन केले.

हेही वाचा –तीन थरांचा मानवी मनोरा रचून गोविंदांनी सादर केला अफझल खानाच्या वधाचा प्रसंग, Video Viral पाहून अंगावर येईल काटा

अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री जेव्हा कृष्ण जन्म झाला तेव्हा वासुदेव आणि देवकीला डांबलेल्या तुरूंगाची सर्व कुलुपे तुटून पडली. यादरम्यान सर्व सैनिक गाढ झोपले होते. बाळ कृष्णाला घेऊन जेव्हा वासूदेव गोकुळाकडे निघाले तेव्हा त्या रात्री आभाळ दाट ढगांनी झाकले होते. जोरदार पाऊस पडू लागला. वि‍जांचा कडकडाट सुरू झाला. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळी वाढली. गोकुळात जाण्यासाठी वासुदेव यांना यमुना नदी ओलांडावी लागणार होती तेव्हा टोपलीत ठेवलेल्या बाळ कृष्णाला डोक्यावर ठेवून वासुदेव यमुना नदीमध्ये उतरतात. असे म्हणतात की श्री कृष्णाच्या चरणांना यमुनेचे पाण्याचा स्पर्श होताच नदी शांत झाली. नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आणि बाळ कृष्णाला घेऊन वासुदेव गोकुळात सुखरूप पोहोचू शकले आणि तुरूंगात असलेल्या पत्नी देवकीकडे परत आले.