VIRAL VIDEO : पेट्रोल पंपावर गाडी थांबवण्याची चूक पडली महागात, डोळ्यादेखत चोरट्यांनी गाडी पळवून नेली

यामध्ये एका व्यक्तीने रात्रीच्या वेळी आपली गाडी पेट्रोल पंपावर थांबवण्याची चूक केली. ही चूक त्याला महागात पडली. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी त्याच्या डोळ्यादेखील कार पळवून नेली. त्यानंतर त्याचं काय झालं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

Thief-Video-Viral
(Photo: Instagram/ suvclub_07 )

आजच्या युगात सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे जिथे दररोज मोठ्या प्रमाणात व्हिडीओ अपलोड केले जातात. त्यापैकी काही व्हिडीओ हसवणारे हसतात तर काही लोकांना भावूक करतात. पण कधी कधी अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात ज्या पाहून आश्चर्य वाटतं. कधी कधी आपल्यासोबत अशा काही घटना घडतात, ज्यांचा विचार आपण कल्पनेत सुद्धा केला नसेल. असाच एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये एका व्यक्तीने रात्रीच्या वेळी आपली गाडी पेट्रोल पंपावर थांबवण्याची चूक केली. ही चूक त्याला महागात पडली. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी त्याच्या डोळ्यादेखील कार पळवून नेली. त्यानंतर त्याचं काय झालं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

ही संपूर्ण घटना जवळच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पेट्रोल पंपावर एक व्यक्ती त्याची आलिशान कार घेऊन पेट्रोल भरण्यासाठी थांबल्याचे दिसून येत आहे. ती व्यक्ती आपल्या आलिशान गाडीतून उतरतो आणि टाकीत पेट्रोल भरतो. त्याच्या गाडीमध्ये एक लहान मूलही बसल्याचे दिसत असून त्याला खाण्यासाठी तो व्यक्ती जवळून काहीतरी खरेदी करण्यासाठी उतरला होता. मात्र, त्यानंतर फ्रेममध्ये असं काही घडतं हे पाहून त्याचे हात पाय थंड पडले. प्रत्यक्षात लक्झरी कारचा मालक परत येताच एक चोर त्याच्या समोर येतो. हा चोरटा त्याच्या खिशातून शस्त्र काढतो आणि आलिशार कारच्या मालकाला धाक दाखवतो.

हातात हत्यार घेऊन आलेला चोरटा पाहून या कार मालकाची पायाखालची जमिनच सरकते. त्या चोरट्याने कार मालकाकडे आलिशान कारची चावी मागितली. त्यावर कार मालकाने त्याच्या गाडीत असलेल्या मुलाला सोडण्याचे आवाहन केलं. त्यानंतर पुढे चोरट्याने जे केलं ते पाहून तुम्ही हादरून जाल.

आणखी वाचा : Viral Video: घरात चोरी करण्यासाठी घुसला चोर; मग पुढे काय घडलं? हे पाहून हसून-हसून दुखेल पोट

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : धरणाची ३० फूट उंच भिंत चढण्याचा स्टंट तरूणाच्या अंगलट, धाडकन खाली पडला, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर suvclub_07 नावाच्या पेजवरून अपलोड करण्यात आला आहे, या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Badmash ka video chor google trends today trending video omg news petrol pump se badmash ne loot li luxury car robber looted luxury car at petrol pump see whatp happen prp

Next Story
एक कॉपी पाठवता येईल का?; स्वत:चं अप्रतिम पोर्ट्रेट पाहून आनंद महिंद्रांनी केली विचारणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी