“बाईपण भारी देवा” चित्रपट सर्वांनी पाहिला आहे. कुटुंब, घर, संसार, नवरा-मुलं, सासू-सासरे, सासर-माहेर, नोकरीमध्ये सर्व काही सांभाळताना, इतरांसाठी जगताना स्वत:साठी विसरून जाणाऱ्या प्रत्येक महिलेची गोष्ट या चित्रपटातून मांडली आहे. हा चित्रपट पाहून अनेक महिलांना आपलीच गोष्ट पडद्यावर पाहतोय की काय असे वाटले. इतरांसाठी जगताना स्वत:साठी जगायला विसरू नये हाच संदेश हा चित्रपट सर्वांना देतो. ही झाली चित्रपटाची गोष्ट पण खऱ्या आयुष्यात मैत्रिणींबरोबर वेळ काढून फिरायला जाणे अनेक महिलांना आजही अशक्य वाटते. पण कास पठार पाहण्यासाठी आलेल्या या महिलांनी खऱ्या आयुष्यात अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करून दाखवली आहे. सध्या या महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये बीड येथून काही महिलांचा ग्रुप कास पठार येथे फिरायला आलेल्या दिसत आहे. व्हि़डीओमध्ये महिला सांगतात की, त्या तापोळा आणि कासपठारला भेट दिली आहे. व्हिडिओ शुट करणारी व्यक्ती महिलांच्या उत्साहाचे कौतूक करताना दिसत आहे. घरच्यांशिवाय किंवा पुरुष व्यक्ती बरोबर नसताना महिला एवढ्या लांब महिला फिरायला आलेल्या बघून छान वाटलं, असेच फिरत राहा असे तो सांगतो.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Video Viral poster
Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी

हेही वाचा – “हा मूर्खपणा थांबवा”, दुर्गापुजेदरम्यान लॅपटॉपवर मिटिंग करतेय ही व्यक्ती, Viral Video पाहून संतापले नेटकरी

व्हिडिओ इंस्टाग्रामवर rz_vlogs नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कुटुंबालाच स्वतःच विश्व समजणारी, स्वतः वेळ काढून स्वतःसाठीच वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजे स्त्री. कास पठारला गेलो त्यावेळी बीड वरून आलेल्या या महिलांच्या ग्रुपबरोबर भेट झाली. कोणताही पुरुष व्यक्ती बरोबर नसतानाही या सर्वजणी इतक्या लांब आल्या यांच कौतुक वाटलं आणि आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत स्वतःला वेळ दिला त्याबद्दल अभिमानही वाटला. अशीच तुमची मैत्री घट्ट राहो आणि तुम्ही नवनवीन ठिकाण पहावी याच शुभेच्छा”

हेही वाचा –“हे कसं शक्य आहे?”, गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या शिखरावर पोहचला श्वान, पण कसा? पॅराग्लायडरने शेअर केलेला Video Viral

व्हायरल व्हिडिओ अनेक महिलांना स्वत:साठी जगण्यासाठी प्रेरणा देत आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांनाही खूप आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांन महिलांच्या उत्साहाचे कौतुक केले. एकाने लिहिले, “बाई पण भारी देवा! स्वत:ला वेळ देणे महत्त्वाचे आहे”

एका महिलेने कमेंट करत सांगितले, “आम्ही देखील ९ महिला जम्मु काश्मिरला फिरायला गेलो होतो १५ दिवस”

“पैसे असल्यावर कुठेही जाता येते दादा” अशी कमेंटही एकाने केली.

Story img Loader