Balya dance on diva railway station Viral Video: नुकताच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’चा एकच जयघोष सुरू झाला. घरोघरी, गल्लोगल्ली, मोठ-मोठ्या मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आणि सुखकर्ता दु:खहर्ता म्हणत या सणाला सुरुवात झाली. असं असताना कधी ११ दिवस गेले कळलंच नाही. काल म्हणजेच १७ सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाला सगळ्या भक्तांनी निरोप दिला.

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जल्लोषाचं वातावरण जरा जास्तच पाहायला मिळतं. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवात आवर्जून कोकणात जातात. कोकणातील घरोघरी बाप्पा विराजमान झालेले असतात, त्यामुळे तिथलं वातावरण अत्यंत भक्तीमय असतं. आरती, पूजा तसेच भजन-कीर्तनामध्ये भाविक मग्न असतात.

bigg boss marathi netizens upset due to riteish deshmukh not coming for bhaucha dhakka
“Bigg Boss सोडून कुठे फिरताय?” रितेश देशमुखचे परदेशातील फोटो पाहून नेटकरी नाराज; कमेंट्सचा पाऊस
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Ankita Prabhu Walawalkar First Job And Payment
Bigg Boss Marathi : कोकण कन्या अंकिता वालावलकरने मुंबईत ‘या’ ठिकाणी केली होती पहिली नोकरी, किती होता पगार? जाणून घ्या…
mumbai Dadar Hindmata Rain Update viral video Mumbai Rain Update Monsoon Update Red Alert
“वेलकम हिंदमाता वॉटर पार्क”, मुसळधार पावसानंतर दादरमधील ‘तो’ VIDEO पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “बीएमसीला ऑस्कर…”
Andheri Metro Station Woman Hawker threatens man viral video
अंधेरी स्थानकाबाहेरील धक्कादायक घटना! अंडी विकणाऱ्या महिलेने चाकू घेतला अन्…; Video पाहून तुम्हीच सांगा नक्की चूक कुणाची ?
Spiderman begging at kalyan railway station video viral on social media
अरेरे! कल्याण रेल्वेस्थानकावर स्पायडरमॅन मागतोय भीक, VIRAL VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Woman riding a bike with tripple seat viral video on social media
“आंटी नंबर १”, ट्रिपल सीट घेऊन काकूंनी चालवली स्पोर्ट्स बाईक, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले…
young girls dressed in saree and dance Kurchi MadathaPetti song Mahesh Babu and Sreeleela song
महेश बाबू अन् श्रीलीलाला ‘या तरुणींनी दिली टक्कर! साडी नेसून केला भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral

हेही वाचा… विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO

कोकणातील एक लोकप्रिय नृत्य म्हणजे बाल्या डान्स. कोणताही सणवार असो, बाल्या डान्स आवर्जून केला जातो. कोकणात बाल्या डान्ससारखं दृश्य पाहणं अगदी सहज-सोप असतं; पण तुम्ही कधी मुंबईत, तेही रेल्वेस्थानकावर बाल्या डान्स पाहिला आहे का? सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची तुफान चर्चा होत आहे. या व्हिडीओत तीन तरुण मंडळी मुंबईतील रेल्वेस्थानकावर बाल्या डान्स करताना दिसतायत.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत मुंबईतील दिवा स्थानकावर काही तरुण मंडळी बाल्या डान्स करताना दिसतायत. ‘सण वर्षाचा हा गौरी-गणपती’ या गाण्यावर तिघं जण थिरकताना दिसतायत. मधोमध मोठा स्पीकर ठेऊन रेल्वेस्थानकावर तिघे जण अगदी आनंदात ठेका धरताना दिसतायत. यामुळे रेल्वेस्थानकावर आजूबाजूला गर्दी झालेलीदेखील पाहायला मिळतेय.

हा व्हिडीओ @utsav_kokancha911 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “सुख म्हणजे कोकणातील गणेशोत्सव बाल्या डान्स”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… काकांचा जबरदस्त डान्स! डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन काकांनी धरला ठेका, कोकणातील गणरायाच्या विसर्जनाचा VIDEO VIRAL

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे फक्त कोकणी माणूसच करू शकतात, खूपच छान भावांनो”, तर दुसऱ्याने “जबरदस्त” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “स्वर्गाहूनी सुंदर आपलं कोकण.”

दरम्यान, याआधी अनेकदा रेल्वेस्थानकावर अनेकांनी रील्स शूट केल्या आहेत आणि त्या व्हायरलदेखील झाल्या आहेत. परंतु, त्यातील अनेक रील्स अश्लील डान्स आणि थिल्लरपणा दाखवणाऱ्या होत्या, त्यामुळे ही लोककला सादर करणाऱ्या या रीलला नेटकऱ्यांचं सध्या भरभरून प्रेम मिळतंय.