Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. यात हिंसाचार, जाळपोळीच्या घटनेमुळे बांगलादेशात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भारतात पलायन केले. बांगलादेशातील अशांततेपासून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शेख हसीना भारतात आल्यानंतर भारतीय लष्कराची तुकडी बांगलादेश विमानतळावर दिसल्याचा आरोप काही वापरकर्ते करत आहेत. पण, खरंच भारतीय लष्कराची तुकडी बांगलादेश विमानतळावर दाखल झाली होती का? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या.

काय होत आहे व्हायरल?

X युजर Tahmina Akter ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.

इतर वापरकर्तेदेखील हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

हेही वाचा – धारावीतील बजरंग दलाच्या अरविंद वैश्यच्या निघृण हत्येचा video आला समोर? नेमकं घडलं काय? वाचा सत्य बाजू

तपास:

आम्ही व्हिडीओमधून कीफ्रेम्स मिळवल्या आणि यावेळी जवानांनी कोणती वर्दी घातली होती, हे झूम इन करून पाहिले. यावेळी वर्दीवर पोलिस असे लिहिले होते.

वायनाडमध्ये बघता बघता संपूर्ण बंगला पाण्याखाली; पुराच्या भयानक दृश्याचे cctv फुटेज नेमके कुठले? वाचा…

यावेळी आम्हाला आढळले की, हा गणवेश बांगलादेशच्या एअरपोर्ट आर्म्ड पोलिस बटालियनचा आहे. आम्हाला त्याचे काही फोटोदेखील सापडले.

आम्हाला मुक्तदिर रशीदची पोस्टदेखील सापडली. त्यांनी लिहिले (भाषांतर) : आज मी ढाका विमानतळाला भेट दिली, जेथे 3 अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, सशस्त्र पोलिस बटालियन (एपीबीएन) सदस्य (व्हिडीओमध्ये पाहिलेले) ५ ऑगस्टला सुरक्षा दलाचा पाठलाग करणाऱ्या गर्दीला पांगवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. यापूर्वी जमावाने मुजीबुरच्या पुतळ्याची हानी केली.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही बांगलादेशातील वरिष्ठ तथ्य तपासक तौसिफ अकबर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी आम्हाला माहिती दिली की, व्हिडीओमध्ये दिसणारे कर्मचारी बांगलादेशी सैन्य आहेत, जे विमानतळ सुरक्षेसाठी जबाबदार आहेत.

निष्कर्ष :

बांगलादेशमधील विमानतळावर भारतीय सैन्याचे जवान पोहोचलेले नाहीत, त्यामुळे बांगलादेशच्या विमानतळावरील त्या व्हिडीओतील सशस्त्र जवान पोलिस बटालियनचे आहेत. त्यामुळे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.