Bangladesh Protest Viral Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनेसंबंधित दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळून आले. या व्हिडीओमध्ये काटेरी तारांच्या कुंपणाजवळ मोठ्या संख्येने लोक जमल्याचे दिसत आहे. बांगलादेशी हिंदू आसाममध्ये येण्यासाठी भारत- बांगलादेश सीमेजवळ थांबले असल्याचा दावा या व्हिडीओच्या माध्यमातून केला जात आहे. तपासादरम्यान आम्हाला हा व्हिडीओ बांगलादेशाशी संबंधित असल्याचे आढळले. पण, त्यातून एक वेगळीच बाजू समोर आली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हेच आपण पाहूया.. काय होत आहे व्हायरल? X युजर Yati Sharma ने हा व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला. इतर वापरकर्तेदेखील समान पोस्ट शेअर करीत आहेत. तपास : आम्ही व्हिडीओमधून मिळविलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून व्हिडीओबाबतचा शोध सुरू केला. आम्हाला YouTube वर अपलोड केलेला एक व्हिडीओ सापडला, ज्याचे शीर्षक आहे : India Bangladesh milan mela. More Stories On Fact Check : Bangladesh Violence :तोंडावर टेप अन् हात-पाय दोरीने बांधून फेकले रस्त्यावर! बांगलादेशात हिंदू मुलीचे अपहरण? पाहा खरं काय आम्हाला अजून एक व्हिडीओ YOUR FRIENDS नावाच्या यूट्यूब चॅनेलवर सापडला. त्या व्हिडीओचे शीर्षक होते : India Bangladesh Milan Mela 15 April 2018. মিলন মেলা at India Bangladesh border हा व्हिडीओ २०१८ साली अपलोड केला गेला होता. आम्हाला आसाम पोलिसांनी एक्सवर शेअर केलेली या व्हिडीओबद्दलची पोस्टदेखील सापडली. पोस्टमध्ये म्हटले आहे की : एप्रिल २०१८ मधील एक जुना व्हिडीओ आसाममधील भारत-बांगलादेश सीमेवरील अलीकडील व्हिज्युअल असल्याचे सांगून चुकीच्या पद्धतीने प्रसारित केला जात आहे. चुकीच्या हेतूने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पण, आम्हाला बांगलादेशातील हिंदूंचा भारतात आश्रय घेण्याचा प्रयत्न करतानाचा अलीकडील व्हिडीओ आढळला. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या एक्स प्रोफाइलमध्ये म्हटले आहे की, भारताच्या जलपाईगुडी जिल्ह्याजवळील सीमावर्ती ठिकाणी ३०० हून अधिक बांगलादेशी जमा झाले आहेत. निष्कर्ष : साल २०१८ मधील भारत - बांगलादेश मिलन मेळ्याचा हा जुना व्हिडीओ आता बांगलादेशी हिंदू आसाम सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.