Bangladesh Jamaat e Islami support CJP protest : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जाणारे एक पत्र आढळले. त्या पत्रामध्ये दावा करण्यात आला होता की, भारतात सुरू असणाऱ्या सीजेपी (CJP) आंदोलकांना बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’ने आपला पाठिंबा दिला आहे. या पत्रावर २१ जुलै २०२६ ही तारीख लिहिलेली होती. तपासादरम्यान आम्हाला पत्र बनावट (फेक) असल्याचे आढळले.

काय होत आहे व्हायरल?

@MeghUpdates एक्स (ट्विटर) युजरने ही पोस्ट त्यांच्या प्रोफाईलवर शेअर केली.

इतर युजर्सदेखील याच दाव्यासह हे पत्र शेअर करीत आहेत.

तपास

आम्ही सर्वांत आधी पत्राचे निरीक्षण करून तपासाला सुरुवात केली. त्यावर कोणताही स्टॅम्प किंवा स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव किंवा सही नव्हती.

त्यानंतर आम्ही बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीचा लोगो शोधण्यासाठी गूगलवर कीवर्ड सर्च केले. तो लोगो पत्रावर दिसणाऱ्या लोगोपेक्षा वेगळा होता.

त्यानंतर आम्हाला या पत्रात काही चुका आढळल्या, जसे की दोन शब्दांमधील जास्त अंतर किंवा पत्रातील शब्दांचे स्पेलिंग. त्यावरून आम्हाला असा संशय आला की, हे पत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्सचा वापर करून तयार केले असावे.

त्यानंतर आम्ही ते zerogpt या AI डिटेक्टरवर तपासले.

या तपासणीतून स्पष्ट झाले की, हा फोटो एआयने तयार केलेला आहे.

बांगलादेश जमात-ए-इस्लामीने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरदेखील स्पष्ट केले होते की, मोठ्या प्रमाणावर शेअर केले जाणारे हे पत्र बनावट आहे.

त्यात म्हटले आहे…

“बांगलादेश जमात-ए-इस्लामीच्या नावाने आणि ‘भारतात सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शूर विद्यार्थ्यांना’ उद्देशून लिहिलेले एक बनावट पत्र विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः भारतात मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहे. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, हे पत्र पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारे आहे. याचा बांगलादेश जमात-ए-इस्लामीशी कोणताही संबंध नाही.”

निष्कर्ष

भारतात सुरू असलेल्या सीजेपी आंदोलकांना बांगलादेश जमात-ए-इस्लामीने पाठिंबा दिल्याची माहिती देणारे व्हायरल होत असलेले हे पत्र बनावट आहे. बांगलादेश जमात-ए-इस्लामीने अधिकृतपणे हे पत्र जारी केल्याचे नाकारले आहे.