Viral Video : सध्या सगळीकडे गणपतीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर गणपतीचे आणि गणेशोत्सवाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ठिक ठिकाणी गणपती प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओमध्ये एका व्हिडिओ ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला चक्क बाप्पाच्या हातावर बसलेला दिसत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मोठी भव्य अशी गणपतीचे मूर्ती दिसेल. सहसा गणपतीच्या एका हातात मोदक असते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपतीच्या हातावर चक्क एक चिमुकला बसलेला दिसेल. हा गोंडस दिसत असलेला चिमुकला सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्वांची नजर या चिमुकल्याकडे जात आहे. निरागस दिसत असलेला चिमुकला सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील शिवाई सार्वजनिक उत्सव मंडळाचा गणपती असून म्हाडाचा गणपती म्हणून ओळखला जातो. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर या गणपतीची एकच चर्चा रंगली आहे.

a son lifted the mother While climbing the steps of the temple emotional video
हीच खरी पुण्याई! मंदिराच्या पायऱ्या चढताना आईला त्रास होऊ नये म्हणून लेकाने कडेवर उचलले, VIDEO पाहून भावूक व्हाल
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
A boy Rishab Dutta from Assam singing Lag Ja Gale song before death in hospitals bed
“..शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो” आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या तरुणानं गायलं गाणं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल
Girls' Stunning dance on Mahabharat tital song
‘महाभारत’च्या टायटल गाण्यावर थिरकल्या मुली, डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा
Young Man Abuses Girlfriend on Street
तुम्ही याला प्रेम म्हणता का? भररस्त्यात प्रेयसीबरोबर तरुणानं केलं असं काही की…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?
Bengaluru Mahalaxmi Murder Updates in Marathi
Mahalakshmi Murder Case : “महालक्ष्मीवर प्रेम होतं, पण तिने मला…”, बॉयफ्रेंडच्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय?
Instagram Love Affair Case
‘तो ‘इन्स्टा’वरच छान दिसत होता’, मुलीने मुलाला नाकारलं; चिडलेल्या मुलानं मग ‘तिचा’ तसला व्हिडीओ केला व्हायरल
asha bhosle express concern among increasing divorce in young generation
“माझे पतीबरोबर भांडण व्हायचे तेव्हा मी…”, आशा भोसलेंनी स्वतःचे उदाहरण देत घटस्फोटांबाबत व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, “आजच्या पिढीमध्ये…”

हेही वाचा : Video : शेतकऱ्याच्या बैलगाडीतून बाप्पाचे आगमन; नेटकरी म्हणाले, “हीच आपली संस्कृती आहे..” मुंबईचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Pune Indapur Truck : पुण्यात मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार! हॉटेल मालकाने जेवण नाकारल्याने हॉटेलमध्ये घातली ट्रक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

mhada_cha_raja या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गोंडस मोदक” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बाप्पाचा सर्वात आवडता मोदक” तर एका युजरने लिहिलेय, “उकडीचा गोड मोदक ” तर आणखी एका युजरने लिहिलेय, “बाप्पाचा मोदक” अनेक युजर्सनी कमेंटमध्ये “गणपती बाप्पा मोरया” चा वर्षाव केला आहे

मुंबईच्या अनेक गणपतीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. सध्या आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकऱ्याच्या बैलगाडीतून बाप्पाचे आगमन होताना दिसत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडला असून हीच आपली संस्कृती असल्याचे म्हणत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

यंदा गणेशोत्सवात कुठे फिरायला जायचे, कोणत्या मंडळांच्या प्रसिद्ध गणेशमूर्ती बघायच्या, याची योजना तयार करीत आहेत. तुम्ही जर गणपती बघण्यासाठी मुंबईला जात असाल, तर मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तीं बघायला विसरू नका. त्यात मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा (नरे पार्क), जीएसबी गणपती, किंग्ज सर्कल, केशवजी नाईक चाळ, गिरगाव आणि तेजुकाया मेन्शन गणपती इत्यादी गणपती न विसरता पाहा.