उत्तर प्रदेशच्या लखनौमधील एका केस कापण्याच्या दुकानातील सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. येथील सलून चालकाने अतिशय किळसवाणा प्रकार केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. सलून चालक ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज करत असताना स्वतःच्या हातावर थुंकला आणि ती थुंकी त्याने ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज करण्याच्या निमित्ताने फासली. या गंभीर प्रकाराची माहिती समोर येताच आता सलून चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी केशकर्तनकाराचे नाव झैद असे आहे. आरोपीच्या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली असून यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेचे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

व्हिडीओमध्ये काय दिसले?

दुकानातील सीसीटीव्ही व्हिडीओनुसार आरोपी झैद ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज करत असल्याचे दिसत आहे. ग्राहकाचे डोळे बंद असल्यामुळे त्याला समोरच्या काचेत झैदचे कृत्य दिसत नाही. मात्र थुंकी त्याच्या चेहऱ्यावर लावत असताना त्याला शंका आली. यामुळे ग्राहकाने नंतर सीसीटीव्ही चित्रण तपासले. झैद स्वतःच्या हातावर थुंकून तीच थुंकी आपल्या चेहऱ्यावर लावत असल्याचे दिसल्यानंतर ग्राहकाला धक्काच बसला. यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

ग्राहकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी झैदला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.