वन्य जीवन, वन्य प्राणी यांच्याविषयी लोकांना नेहमीच उत्सुकता आणि कुतुहल वाटत आलं आहे. जंगलातील प्राणी आपली भूक भागवण्यासाठी आपल्यापेक्षा कमकुवत प्राण्यांची शिकार करतात. त्यांच्या हल्ल्यांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जंगलातील अनेक भयावह व्हिडीओ आत्तापर्यंत समोर आले आहेत. जंगली प्राणी आणि त्यांच्या करामती आपण नेहमीच पाहत असतो. आता अस्वलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मानव जंगलांपर्यंत पोहोचला आहे. असाच एक अस्वलाचा मानवी वस्तीमध्ये आलाय, त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अस्वल मानवी वस्तीत दहशत निर्माण करताना दिसत आहे. तर दुसरीकडे पाच जण घराच्या छतावर चढून त्याला पकडण्यासाठी जाळी पसरवताना दिसत आहेत. मात्र अचानक अस्वल रागाने छतावर चढतं आणि सर्वांवर हल्ला करायला त्यांच्या मागे धावू लागतं. त्यानंतर अस्वालाचा राग बघून सगळे आपला जीव वाचवून पळताना दिसत आहेत. पाहा व्हिडीओ हेही वाचा - साप उंबरठ्यावर अन् चिमुकलीची एन्ट्री, हृदयाचे ठोके चुकवणारा हा Video पाहून व्हाल थक्क हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला जात आहे. जो @TheFigen_ नावाच्या प्रोफाइलवरुन ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.