जम्मू-काश्मीरच्या सौंदर्याचे किस्से भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत. कदाचित म्हणूनच लोक त्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. सौंदर्यामुळे काश्मीर हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वर्षभर देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येतात. काश्मीर खोऱ्यातील कोपरा न कोपरा सुंदर दृश्यांनी भरलेला आहे. पण तरीही अशी अनेक ठिकाणे आहेत जी प्रेक्षणीय स्थळ म्हणून फारसे प्रसिद्ध नाही, पण जर तुम्हीही इथे पोहोचलात तर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत असल्याचा अनुभव येईल. असेच एक ठिकाण म्हणजे काश्मीरची बांगस व्हॅली. नॉर्वेजियन राजनयिक एरिक सोल्हेम यांनी अलीकडेच त्यांच्या बांगास व्हॅलीच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात असलेल्या बंगस व्हॅलीच्या या छोट्या व्हिडीओमध्ये नदीतून स्वच्छ आणि निखळ पाणी वाहताना दिसत आहे. घोडे हिरवे गवत खात उभे आहेत आणि हिरव्या गार डोंगरांना पाहून डोळे अगदी सुखावतात. या व्हिडीओमध्ये एरिक सोल्हेमने ‘इन्क्रेडिबल इंडिया’ असे कॅप्शन दिले आहे. ही बंगस व्हॅली जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये असल्याचेही त्यांनी लिहिले आहे. हा व्हिडीओ शेअर होताच तो व्हायरल देखील झाला.

आणखी वाचा : नशेत धुंद महिलेचा VIDEO VIRAL, उभंही राहता येत नव्हतं….

बंगस व्हॅलीचे नाव बाणा (वन) आणि गुस (गवत) या दोन संस्कृत शब्दांवरून पडले आहे. ही दरी उंच पर्वतांसाठी ओळखली जाते. विविध प्रजातींचे वनस्पती आणि प्राणी येथे आढळतात. काश्मीरच्या गुलमर्ग आणि पहलगामच्या भागांप्रमाणेच एकापेक्षा एक सुंदर दृश्य या व्हिडीओमध्ये कैद केले आहेत. इथले सुंदर तलाव, बर्फाच्छादित पर्वत आणि हिरव्यागार कुरणांसाठी ओळखले जाते, परंतु ते पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध नाही.

आणखी वाचा : रस्त्यावर काम करून पक्ष्यांची भूक भागवतो हा व्यक्ती, मनाला भावणारा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे असलेली बंगस व्हॅली राजधानी श्रीनगरपासून ७० किमी अंतरावर आहे. दहशतवादी घटनांमुळे डोंगर आणि कुरणांनी वेढलेली ही दरी पर्यटनाच्या दृष्टीने तितकी लोकप्रिय नाही, परंतु अलीकडच्या वर्षांत लोकांमध्ये ते एक ऑफबीट डेस्टिनेशन म्हणून ओळखले जात आहे. दरी संपूर्ण वर्षभर गजबजलेली असते, परंतु जर तुम्हाला हिरव्यागार गवताने झाकलेले पर्वत आणि मैदाने पहायची असतील तर एप्रिल ते सप्टेंबर हे महिने सर्वोत्तम आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न न करताच पळून गेला नवरदेव, नवरीनं त्याचा पाठलाग करत गाठलं, पण….

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका व्यक्तीने असा नागिन डान्स केला की नाग बनून दुसऱ्या माणसाच्या अंगावर उडीच घेतली…

लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “हा सुंदर व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद सर. काही लोक फक्त स्वित्झर्लंडबद्दल विचार करतात.” दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘कुपवाड्याचे प्रवेशद्वार, ही दरी गुलमर्ग आणि पहलगामसारखी खूप सुंदर आहे, परंतु संस्कृतीने समृद्ध आहे आणि ती गर्दी नसलेली आहे. तिसर्‍या व्यक्तीने कमेंट सेक्शनमध्ये असेही लिहिले की, “अनेक मोत्यांप्रमाणे, हा देखील महान भारताचा मोती आहे.”