सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याचं कारण लावणी आणि रिलस्टार गौतमी पाटीलच आहे. गौतमी पाटीलने अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळवली. तिच्या लावणीच्या जाहीर कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि त्यानंतर होणारी धक्काबुक्की, हाणामारी या सगळ्या बातम्या अनेकदा आल्या आहेत. मात्र आता गौतमी पाटील चर्चेत आहे ती बीडमधल्या तिच्या कार्यक्रमामुळे. बीडमधल्या एका हौशी नवऱ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात ती आली ती नाचली आणि तिने उपस्थितांची मनं जिंकली. मात्र बीडमधल्या या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची चर्चा चांगलीच होताना दिसते आहे.

काय घडलं बीडमध्ये गौतमी पाटील आल्यावर?

बीडमधल्या आष्टीमधल्या किरण गावडे यांनी त्यांची बायको प्रगती गावडे यांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून चक्क गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला. गौतमी पाटील या कार्यक्रमाला आल्यानंतर सगळेच उपस्थित बेभान झाले होते. निमगाव बोडखा या ठिकाणी हा कार्यक्रम होता. तिथे जमलेल्या सगळ्या उपस्थितांनी गौतमीच्या तालावर ठेका धरला.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

किरण गावडे यांनी या कार्यक्रमाबाबत काय सांगितलं?

किरण गावडे म्हणाले की, माझी पत्नी प्रगती गावडे हिच्या वाढदिवसाला मी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. माझ्या पत्नीनेच ही मागणी केली होती. तिच्या आग्रहासाठीच हा कार्यक्रम ठेवला होता. तो यशस्वी झाला. पत्नीची इच्छा मी पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे असंही किरण गावडे यांनी सांगितलं.गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात वाढदिवसाचं होणारं सेलिब्रेशन वाढलं आहे. अशात अशा कार्यक्रमांना गौतमी पाटील यांनी बोलावलं गेलं आहे. गौतमी पाटीलच्या हातून केक कापून प्रगती गावडे यांचा वाढदिवस साजरा झाला.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. १० वी पर्यंत शिक्षण घेऊन तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली. गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून गौतमीने सादरीकरण केले. पहिल्यांदा लावणी केल्यावर गौतमीला ५०० रुपये मानधन मिळाले होते. गौतमी सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. तिचे रिल्स कायम चर्चेत असतात.

मराठी चित्रपटात झळकणार

काही दिवसांपूर्वी गौतमीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. ‘घुंगरु’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. “माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा” असेही आवाहन तिने केले आहे.