Beggar Dance Viral Video: रस्त्यावर एखादा भिकारी दिसला की, आपण साधारणपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो; पण कधी कधी अशाच साध्या दिसणाऱ्या व्यक्तीत दडलेलं टॅलेंट पाहिलं, की डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भिकारी असा डान्स करताना दिसतो की, तो थेट बॉलीवूड स्टारलाही टक्कर देतो.
रस्त्यावर भिकाऱ्याचा एक भन्नाट डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गोविंदाच्या स्टाईलमध्ये सादर केलेल्या त्याच्या जबरदस्त स्टेप्स पाहून नेटकरी अक्षरशः थक्क झाले असून, हा एआय व्हिडीओ आहे का खरा असा सवालही अनेकजण करत आहेत. या व्हिडीओतील त्याची ऊर्जा, ताल आणि एक्सप्रेशन्स पाहून लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.
या व्हिडीओची सुरुवात अगदी साधी आहे. रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक भिकारी दिसतो. अंगावर जुने, फाटके आणि मळकट कपडे… पण पुढच्याच क्षणी तो जे करतो, ते पाहून सगळेच अवाक् होतात. अचानक म्युझिक सुरू होतं आणि हा भिकारी अगदी आत्मविश्वासानं डान्स करायला लागतो.
विशेष बाब म्हणजे, त्याच्या डान्समध्ये केवळ हालचाली नाहीत, तर एक वेगळीच ऊर्जा आणि ताल दिसतो. तो ज्या प्रकारे हातवारे करतो, स्टेप्स घेतो आणि शरीराची लय साधतो, ते पाहून असं वाटतं की, तो एखाद्या प्रशिक्षित डान्सरसारखा आहे. त्याच्या प्रत्येक स्टेपमध्ये अचूकता, टायमिंग आणि एक्स्प्रेशन इतकं जबरदस्त आहे की, पाहणारेही थक्क होतात.
हा भिकारी गोविंदाच्या गाण्यावर अगदी त्याच्यासारख्या स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतो. त्याच्या स्टेप्समध्ये गोविंदाची झलक स्पष्टपणे जाणवते. थोडा खट्याळपण, थोडी मस्ती आणि भरपूर एनर्जी! विशेष बाब म्हणजे तो ज्या सहजतेने या स्टेप्स करतो, ते पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की, हा माणूस रस्त्यावरचा भिकारी आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिलं, “वा! काय जबरदस्त डान्स आहे याचा!” तर दुसऱ्यानं म्हटलं, “याच्या मूव्ह्ज पाहून मोठे डान्सरही लाजतील.” आणखी एकानं प्रतिक्रिया देताना लिहिलं, “हा भिकारी नाही, लपलेला स्टार आहे!”
हा व्हिडीओ trendy_duniya28 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, काही सेकंदांचा असला तरी लोकांना प्रचंड आवडला आहे. हजारो लाइक्स आणि व्ह्यूज मिळवीत हा व्हिडीओ सतत व्हायरल होत आहे.
या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. टॅलेंट कोणाचंही अवलंबून नसतं. परिस्थिती कशीही असो, कला कुठेही आणि कधीही फुलू शकते. रस्त्यावरचा हा भिकारीही आपल्या डान्समुळे आज लाखो लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
