Beggars Scam Viral Video : रस्त्यावरुन प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल सिग्नलवर अनेक महिला आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन भीक मागत असतात. यात काही पुरुष दोन हातात कुबड्या घेऊन प्रत्येक वाहन चालकाकडून पैशांची भीक मागत असतो. अनेकदा आपण गरीब समजून त्यांना भीक देतो ही, पण ते कोण आहेत खरचं ते अपंग आहेत याचा विचार करतो का? नसेल तर एकदा हा व्हिडीओ पाहा आणि पुन्हा भीक देताना विचार करा.
सोशल मीडियावर एका पुरुष भिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो सिग्नलवर उभ्या असलेल्या बाईक स्वारांकडून भीक मागतोय. पण सिग्नल सुटताच तो भिकारी असं काही रुप बदलतो की पाहून तुम्हाला धक्का बसेल,
व्हायरल व्हिडीओ एका कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओमध्ये एक भिकारी कुबड्यांच्या साहाय्याने सिग्नलवर लोकांसमोर लंगडत चालतोय आणि पायाचा त्रास असल्याचे भासवून भीक मागतोय. यावेळी तो सिग्नलवर थांबलेल्या एका स्कूटरवरील जोडप्याकडे जातो आणि भीक मागू लागतो, तो काही केल्या त्यांच्या बाजूने हटत नाही, त्यामुळे ते जोडपं वैगातून त्याला पैसे देऊ टाकतात. सिग्नल ग्रीन होताच सर्व गाड्या जाऊ लागतात आणि तो भिकारी देखील रस्त्याच्या बाजूला होतो. याचवेळी त्या भिकाऱ्याची खरी ओळख उघड होते. तो भिकारी भीक मागण्यासाठी फक्त लंगडण्याचे नाटक करत होता. कारण सर्वजण निघून गेल्यानंतर तो अगदी घडधाकड माणसाप्रमाणे व्यवस्थित चालू लागला.
भिकाऱ्याच्या स्कॅमचा हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझरने लिहिले, “दयाळू व्हा, पण आंधळे होऊ नका.” दुसऱ्या एका युझरने लिहिले, “असे लोक तुम्हाला प्रत्येक सिग्नलला भेटतील, जे अपंग असल्याचे नाटक करून भीक मागत असतात.”
