Bike Accident On Bengaluru :वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघातामध्ये कित्येक लोक दरवर्षी आपला जीव गमावतात तरीही अनेकांना शहाणपणा येत नाही. कोणी भरधाव वेगाने वाहन चालवताना दिसते, कधी कोणी सिग्नलला थांबत नाही, कोणी वाहन चालवताना आसपास काय आहे,काय नाही हे पाहत नाही आणि अक्षरश: एखाद्याच्या अंगावर गाडी चढवतात. अशा अपघाताचे व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण लोकांना स्वत:च्या जीवाची पर्वा नसते पण दुसऱ्यांच्या जीवाची देखील नसते.
सोमवारी बंगळुरूमधील सर्जापूर रोडवर झालेल्या धक्कादायक अपघातचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन दुचाकीस्वार भरधाव वेगाने दुचाकी चालवत असताना त्यांचा अपघात होतो. दोघे दुचाकीस्वार रस्त्यावरून धावणाऱ्या बसखाली चिरडले जाण्यातून थोडक्यात बचावतात. ही घटना घडली जेव्हा दुचाकीस्वारांनी वेगाने जाण्याचा आणि जड वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते पण परंतु रस्त्यावर पार्क केलेल्या व्हॅनला ते धडकल्याने हा अपघात झाला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आता वर्दळीच्या रस्त्यावरील नियमित वाहतुकीपासून सुरू होतो. रस्त्याच्याकडेला असलेल्या दुकानांमधून स्कूटर आणि कार जात आहेत. परंतु काही सेकंदातच, फुटेजमध्ये दुचाकी स्वार अतिवेगाने आणि निष्काळजीपणे ओव्हर टेक करत असल्याचे दिसून येते. त्यानंतर एका व्हॅनला ते धडकतात. ते दोघेही हवेत फेकले जातात आणि रस्त्यावर पडतात. दरम्यान त्याच वेळी तेथून एक बस धावत होते. दोघेही तरुण चालत्या बसच्या चाकांपासून काही इंच अंतरावर पडतात. सुदैवाने, बस त्यांना चिरडून टाकत नाही ज्यामुळे ते थोडक्यात वाचतात. सिग्नलवर बस काही मीटर पुढे थांबते. जखमी दुचाकीस्वारांना मदत करण्यासाठी स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतात. त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती अद्याप मिळालेली नाही. आतापर्यंत, या प्रकरणात पोलिस कारवाईबद्दल कोणतेही वृत्त नाही.
ही संपूर्ण घटना दुचाकीच्या मागे असलेल्या एका कारच्या डॅशकॅमने रेकॉर्ड केली. व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्सनी प्रतिक्रिया दिल्या.
हे फुटेज ‘ड्राइव्ह स्मार्ट’ या पेजने X वर शेअर केले होते आणि त्याला आधीच ८,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे रस्ता सुरक्षा आणि बेदरकारपणे गाडी चालवण्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
“तो स्वतःला दोष देईल की, पार्क केलेल्या वाहनाला त्याच्या मार्गात अडथळा आणल्याबद्दल दोष देईल?”, व्हिडिओ शेअर करताना व्हिडिओला असे कॅप्शन दिले आहे.
“धोकादायकपद्धतीने गाडी चालवून रस्त्यावर इतरांना घाबरल्याबद्दल त्याला अटक करावी”, एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.
“बेपर्वा गाडी चालवली! कर्माचे फळ मिळाले!”, दुसऱ्याने म्हटले.