Premium

कहरच केला राव! चक्क खूर्चीवर बसून रिक्षा चालवतोय हा माणूस; VIRAL फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल

एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर एका व्यक्तीने बंगळुरूमधील एका रिक्षाचालकाचा फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो रिक्षामध्येच ऑफिसमधील खुर्चीवर बसलेला दिसत आहे.

The rickshaw puller's trick,
रिक्षाचालकाचा हटके जुगाड, सीटच्या जागी बसवली खुर्ची. (Photo : Unplash)

सोशल मिडियावर रिक्षावाले नेहमी चर्चेत असतात. कधी रिक्षाचालकाच्या वर्तनामुळे, कधी हटके रिक्षामुळे. आता पुन्हा एकदा एका रिक्षाची चर्चा सुरू आहे. ही रिक्षाही जरा हटकेच आहे कारण या रिक्षामध्ये रिक्षाचालकाचे सीट अगदी हटके आहे. सोशल मीडियावर रिक्षाच्या हटके सीटचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो बंगळुरूच्या रिक्षामधील आहे. बंगळुरूच्या प्रवासी ही रिक्षापाहून थक्क झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर एका व्यक्तीने बंगळुरूमधील एका रिक्षाचालकाचा फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो रिक्षामध्येच ऑफिसमधील खुर्चीवर बसलेला दिसत आहे. तास न तास कम्प्युटरसमोर बसून गेम खेळणाऱ्यांसाठी वापरली जाणारी खुर्ची या रिक्षाचालकाने रिक्षामध्ये वापरली आहे.

फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”फक्त टेक्नोलॉजी वापरणाऱ्यांनी सर्व मज्जा का अनुभवावी?” फोटो पोस्ट करताच तुफान व्हायरल झाला. अनेकांनी फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहे. एकाने लिहिले, ”स्ट्रिट गेमिंग”, दुसऱ्याने लिहिले, तुम्ही बंगळुरुमध्ये आहात हे न सांगता बंगळुरुमध्ये आहात हे सांगा”

हेही वाचा – महिलेचा Neck Dance पाहून तुमचीही मान दुखायला लागेल? व्हायरल व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

ही काही पहिली वेळ नाही जेव्हा रिक्षामध्ये प्रवास करताना प्रवाशांनी अशी आगळी-वेगळी गोष्ट अनुभवली असावी. काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाने सांगितले की, एका रिक्षाचालकाने त्याला सांगितले की जर तुम्ही सोशल मीडियावर त्यांच्या रिक्षातून प्रवास कसा वाटला शेअर करणार असाल तर त्याच्या इंस्टाग्राम हँडलला टॅग करा.

हेही वाचा –“बाप्पा, मोबाईलकडे बघ..” फोटो काढण्यासाठी चिमुकलीने लाडक्या गणरायाला दिली साद, गोंडस व्हिडिओ होतोय व्हायरल

आणखी एका प्रवाशाने सांगितले की, त्याने अशा रिक्षातून प्रवास केला जिथे प्रवासी आणि चालकाच्या बाजूला दरवाज्या आणि खिडकीच्या काचांना रंगेबेरिंगी एलईडी लाइट लावलेली होती”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bengaluru auto driver drives around sitting on an office chair pic is viral snk

First published on: 24-09-2023 at 16:19 IST
Next Story
आई-वडील झोपेत असताना ६ महिन्यांच्या मुलाची बोटे उंदरांनी खाल्ली, पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर