सोशल मीडियावर अनेकदा विचित्र गोष्टींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. बंगळूरूच्या कल्याणनगरमधील एक व्हिडिओ ज्यामध्ये एक माणूस एका कुत्र्याला थेट धावत्या कारच्या छतावर उभे केले आहे. कुत्र्याच्या सुरक्षेसाठी त्याला दोरी किंवा हार्नेस देखील बांधलेली नाही. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे जो पाहून नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
कर्नाटक पोर्टफोलिओ नावाच्या एक्स खात्यावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जेव्हा कारचालकाला या कृत्यासाठी जाब विचारला तर त्याने उद्धटपणे उत्तर दिले. जे पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर होत आहे.
व्हिडीओमध्ये फुटेजमध्ये तीन कुत्रे कारच्या छताला चिकटून बसलेले दिसत आहे. या कृत्यामुळे रस्त्यावरील प्राण्यांना आणि इतरांना धोका निर्माण होण्याच्या भीतीने शेजारी उभे असलेले लोक घाबरलेले दिसत आहे. या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या एका संबंधित नागरिकाने कार चालकाला जाब विचारला तेव्हा त्याला त्याच्या कृत्याचा कसलाही पश्चात्ताप नव्हता उलट तो उद्धटपणे शिवीगाळ करत होता, ज्यामुळे परिस्थिती आणखीच वादग्रस्त ठरली.
“शहरात असे बेपर्वा वर्तन करताना या मुलांची पहिलीच वेळ नाही. असाच प्रकार कल्याणी नगरमध्येही दिसले. महामार्गावर चालत्या कारच्या छतावर अनेक कुत्रे धोकादायकरित्या बसवलेले दिसले, ज्यामुळे प्राण्यांना प्रचंड भीती वाटत होती आणि ते अवस्थ दिसत होते आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अशा बेजबाबदार कृतींमुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे मानवी जीवन आणि निराधार प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे,” असे कॅप्शनमध्ये सांगितले आहे.
एक्स हँडलने अधिकाऱ्यांना त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले, या कृत्याचे वर्णन करत वाहतूक आणि प्राणी सुरक्षा कायद्यांचे घोर उल्लंघन आहे हे देखील अधोरिखित केले. “हे निष्काळजीपणाचे कृत्य अमानवी आहे पण त्याचबरोबर वाहतूक आणि प्राणी सुरक्षा कायद्यांचेही उघड उल्लंघन आहे. या धोकादायक वर्तनासाठी जबाबदार व्यक्ती ओळखून त्वरित कारवाई करावी अशी अधिकार्यांना विनंती आहे,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
वाहनाच्या लायसन्स प्लेटवर कॅप्चर केलेल्या व्हिडिओमध्ये कारवर एक “प्रेस” स्टिकर आणि “हरी लाइक्स रिस्क” असे लिहिलेले स्टिकर देखील दिसले.
व्हिडिओ पहा:
पोस्टला प्रतिसाद देताना, एका X वापरकर्त्याने लिहिले, “मला आशा आहे की त्याला अटक केली जाईल… आणि मला आशा आहे की अटक झाल्यानंतर त्याने “हरीला शांत होण्याची गरज आहे” असे लिहिले आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “आशा आहे की त्याला धडा शिकवला जाईल, आमच्या जबाबदार पोलिस पथकाद्वारे रहदारी नियमांची अंमलबजावणी करा.”
तिसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “तो अशा प्रकारचा दिसतो जो त्याच्या कुत्र्यांना सोडून देईल.”
चौथा वापरकर्ता म्हणाला, “हे मान्य नाही. तो त्या प्राण्याला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांचाही जीव धोक्यात टाकत आहे. त्याला मोठा दंड ठोठावला पाहिजे आणि माणसांशी कसे बोलावे हे शिकण्यासाठी त्याला पुन्हा शाळेत पाठवले पाहिजे.”