Indian Railway Ticket Viral: देशभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. आशियातली सर्वांत मोठी आणि जगातली चौथी सर्वांत मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं. भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित, सोईचं व परवडणारं वाटतं. रेल्वेनं प्रवास करायला बहुतेक जणांना आवडतं. ट्रेनमध्ये कंटाळा आला, असं म्हणणारा क्वचितच कोणी असेल. रेल्वेचा प्रवास हा सोपा आणि स्वस्त मानला जातो, म्हणूनच दैनंदिन जीवनात प्रवासासाठी भारतातील लोकांचा कल रेल्वेकडे असतो. भारतातील प्रवाशांचा मोठा वर्ग भारतीय रेल्वेचा वापर करतो. अशा परिस्थितीत, एक युजरसुद्धा बेंगळुरू ते कोलकाता जाण्यासाठी रेल्वे वेबसाइट IRCTC वर सेकंड एसी तिकीट तपासत होता. पण, जेव्हा त्याने 2nd AC तिकिटाचे भाडे पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण प्रत्यक्षात डायनॅमिक चार्जमुळे त्याला अडीच ते तीन हजार रुपयांचे तिकीट महागड्या भाड्याने मिळत होते. त्याने ट्रेनच्या तिकीट भाड्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो Reddit प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला. यानंतर युजर्सही या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. @chuggingdeemer नावाच्या हँडलने हा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर पोस्ट केला आहे. चित्रात IRCTC चे तिकीट बुकिंग सेवा ॲप दिसत आहे, ज्यामध्ये ट्रेन क्रमांक १२८६४ च्या सेकंड एसीची किंमत लिहिलेली आहे. वापरकर्ता ९ ऑगस्टचे हे तिकीट तपासत होता, तिथे त्याला सात सेकंड AC जागा रिकाम्या दिसल्या. परंतु, प्रीमियम तत्काळ तिकिटाचे अडीच-तीन हजार रुपयांचे भाडे १० हजार १०० रुपये दिसले. Reddit वर हे चित्र पोस्ट करताना युजर म्हणतो, "मला सांगा २,९०० रुपयांच्या तिकिटासाठी १०,००० रुपये कोण देणार?" तथापि, बेंगळुरू आणि कोलकाता हे अंतर अंदाजे १९५० किलोमीटर आहे. (हे ही वाचा: दारुच्या नशेत रुळावर झोपला व्यक्ती अन् अख्खी ट्रेन गेली अंगावरुन; पण घडलं असं की, Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही) कमेंट सेक्शनमध्ये युजर्स तिकिटाच्या वाढीव भाड्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, "जर चार लोकांचे कुटुंब असेल तर ते असेच ४० हजार रुपये खर्च करतील." फोटो शेअर करताना दुसऱ्या युजरने लिहिले की, "या प्रीमियमचा तात्काळ उपयोग नाही." वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या चित्रात, २६७६ रुपयांच्या तिकिटावर ६८४८ रुपये डायनॅमिक शुल्क आकारण्यात आले आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, "इतके पैसे खर्च करण्याऐवजी मी विमानाने प्रवास करणार.", अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. येथे पाहा तिकिट