Indian Railway Ticket Viral: देशभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. आशियातली सर्वांत मोठी आणि जगातली चौथी सर्वांत मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं. भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित, सोईचं व परवडणारं वाटतं. रेल्वेनं प्रवास करायला बहुतेक जणांना आवडतं. ट्रेनमध्ये कंटाळा आला, असं म्हणणारा क्वचितच कोणी असेल. रेल्वेचा प्रवास हा सोपा आणि स्वस्त मानला जातो, म्हणूनच दैनंदिन जीवनात प्रवासासाठी भारतातील लोकांचा कल रेल्वेकडे असतो.

भारतातील प्रवाशांचा मोठा वर्ग भारतीय रेल्वेचा वापर करतो. अशा परिस्थितीत, एक युजरसुद्धा बेंगळुरू ते कोलकाता जाण्यासाठी रेल्वे वेबसाइट IRCTC वर सेकंड एसी तिकीट तपासत होता. पण, जेव्हा त्याने 2nd AC तिकिटाचे भाडे पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण प्रत्यक्षात डायनॅमिक चार्जमुळे त्याला अडीच ते तीन हजार रुपयांचे तिकीट महागड्या भाड्याने मिळत होते. त्याने ट्रेनच्या तिकीट भाड्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो Reddit प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला. यानंतर युजर्सही या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

Konkan Railway, Konkani passengers, Konkan,
कोकणी प्रवासी कायम दुर्लक्षित
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Mumbai Local Train Update
Mumbai Local Train : ठाकुर्लीजवळ ओव्हरहेडमधील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत; एक तासाहून अधिक काळ लोकल खोळंबल्या, प्रवाशांचा संताप
mumbai local train update 175 local trains cancelled by western railway
Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेच्या १७५ लोकल रद्द होणार
Mumbai Local News
Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेचं प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन, “ट्रेनमध्ये अडकून पडला असाल तर…”
Huge snake enters railway station
बापरे! रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसला भलामोठा साप; प्रवाशांचा उडाला थरकाप अन् पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO
Viral VIDEO: Youth Attempts To Pull Train Engine With Bike For Social Media Reels In UP's
रिलसाठी काहीही! रील बनवण्यासाठी तरुणाने दुचाकीने ओढली ट्रेन; धोकादायक स्टंटचा VIDEO व्हायरल
Central Railway
Central Railway : आता फुकटात एसी किंवा फर्स्ट क्लासने प्रवास करणं पडणार महागात; मध्य रेल्वेनं घेतला ‘हा’ निर्णय!

@chuggingdeemer नावाच्या हँडलने हा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर पोस्ट केला आहे. चित्रात IRCTC चे तिकीट बुकिंग सेवा ॲप दिसत आहे, ज्यामध्ये ट्रेन क्रमांक १२८६४ च्या सेकंड एसीची किंमत लिहिलेली आहे. वापरकर्ता ९ ऑगस्टचे हे तिकीट तपासत होता, तिथे त्याला सात सेकंड AC जागा रिकाम्या दिसल्या. परंतु, प्रीमियम तत्काळ तिकिटाचे अडीच-तीन हजार रुपयांचे भाडे १० हजार १०० रुपये दिसले. Reddit वर हे चित्र पोस्ट करताना युजर म्हणतो, “मला सांगा २,९०० रुपयांच्या तिकिटासाठी १०,००० रुपये कोण देणार?” तथापि, बेंगळुरू आणि कोलकाता हे अंतर अंदाजे १९५० किलोमीटर आहे.

(हे ही वाचा: दारुच्या नशेत रुळावर झोपला व्यक्ती अन् अख्खी ट्रेन गेली अंगावरुन; पण घडलं असं की, Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही)

कमेंट सेक्शनमध्ये युजर्स तिकिटाच्या वाढीव भाड्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “जर चार लोकांचे कुटुंब असेल तर ते असेच ४० हजार रुपये खर्च करतील.” फोटो शेअर करताना दुसऱ्या युजरने लिहिले की, “या प्रीमियमचा तात्काळ उपयोग नाही.” वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या चित्रात, २६७६ रुपयांच्या तिकिटावर ६८४८ रुपये डायनॅमिक शुल्क आकारण्यात आले आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, “इतके पैसे खर्च करण्याऐवजी मी विमानाने प्रवास करणार.”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

येथे पाहा तिकिट