scorecardresearch

‘मालकाला हिंदू कुटुंब हवे’ असे म्हणत बेंगळुरूतील महिलेला नाकारलं जातंय घर; ट्विटरवर स्क्रीनशॉट पोस्ट करत व्यक्त केला संताप

बेंगळुरूमध्ये घर शोधणाऱ्या एका महिलेला तिच्या धर्मामुळे घरमालकांनी घर देण्यास नकार दिला.

‘मालकाला हिंदू कुटुंब हवे’ असे म्हणत बेंगळुरूतील महिलेला नाकारलं जातंय घर; ट्विटरवर स्क्रीनशॉट पोस्ट करत व्यक्त केला संताप
बेंगळुरूमध्ये घर शोधणाऱ्या एका महिलेला तिच्या धर्मामुळे घरमालकांनी घर देण्यास नकार दिला. (Twitter)

भाड्याने घर मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट झाली आहे. घर शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधीकधी लोकांचा फक्त कुटुंबाला घर भाड्याने देण्याकडे कल असतो. घरमालक मुलांना किंवा मुलींना घर देण्यास नकार देतात आणि जर त्यांना घर मिळालेच तरी बरेचदा त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादले जातात. मात्र बेंगळुरूमधील एका महिलेला वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

बेंगळुरूमध्ये घर शोधणाऱ्या एका महिलेला तिच्या धर्मामुळे घरमालकांनी घर देण्यास नकार दिला. हैफा नावाच्या महिलेने घरमालकाशी झालेल्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी तिच्या धर्माबद्दल जाणून घेतल्यानंतर तिला घर देण्यास नकार दिला आहे.

एका चॅटमध्ये, मध्यस्थी व्यक्ती हैफाला तिचे नाव विचारते. त्यानंतर सांगितले जाते “मालमत्ता उपलब्ध आहे पण मालकाला हिंदू कुटुंब हवे आहे.” या महिलेची पोस्ट व्हायरल झाली आहे. तिने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, “प्रत्येकाचा स्वातंत्र्याचा ७५वा वर्धापन दिन साजरा करून झाला असेल, तर मी माझा १५ ऑगस्ट कसा घालवतेय ते पाहा.” या चॅटचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत.

“मला कंटाळा आलाय ग अभ्यास करून”; वैतागलेल्या चिमुरडीचा क्युट Video सोशल मीडियावर Viral

चार पायांवर चालणाऱ्या सापाला पाहून नेटकरीही पडले बुचकळ्यात; हा Viral Video एकदा पाहाच

दरम्यान, या घटनेनंतर काहींनी धार्मिक भेदभावाच्या आधारे तिने पोलिसांत तक्रार दाखल करावी असे सुचवले, तर काहींनी म्हटले की ही सर्वस्वी मालकांची निवड आहे की त्यांना कोणासोबत व्यवहार करायचा आहे. तर नवीन नावाच्या एका वापरकर्त्याने सामान्य भूमिका घेत म्हटले की, “आमच्या ‘आधुनिक मेट्रो शहरांमध्ये’ अनेक हिंदूंना ते मांस खातात म्हणून घर मिळत नाही. बॅचलर पुरुषांना घर मिळत नाही कारण ते मद्यपान आणि धूम्रपान करतात. अविवाहित महिलांना भाड्याने घर मिळत नाही कारण त्या ‘संकटाला आमंत्रण’ देतात. पोलीस, वकील आणि पत्रकारांना घर मिळत नाही कारण ते कायद्याला धरून बोलतात.”

“अरे बहुत जगह हैं”चं फीमेल व्हर्जन सोशल मीडियावर होतंय व्हायरल; Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

दरम्यान, आणखी एकाने असाच अनुभव शेअर करत लिहिले, “ही काही मोठी गोष्ट नाही, मी मुस्लिम असल्यामुळे मला भाड्याने खोली मिळू शकली नाही. तसेच, असेही लोक आहेत ज्यांना अशा प्रकारच्या समस्या नाहीत. काही लोकांनी मला नम्रपणे सांगितले की त्यांना कोणतेही मांसाहारी लोक नको आहेत, वाईट वाटून घेऊ नका.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या