कुत्र्यामुळे तिने लग्न मोडले

होणा-या पतीने कुत्र्याला स्विकारण्यासाठी दिला नकार

कुत्र्याला सोडून दे म्हटल्यावर मात्र तिने थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

काही जणांचे प्राणीप्रेम इतके असते की काही झाले तरी ते आपल्यापासून त्यांना दूर लोटत नाही. आता हेच बघा ना एका मुलीने तर आपल्या पाळीव कुत्रीवरील प्रेमापोटी ठरलेले लग्न मोडले. या मुलीची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरु आहे. मुळची बंगळुरूची असणारी करिश्मा वालिया ही एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करते. तिचे लग्न ठरले होते. मुलगा दिसायला चांगला असल्याने आणि चांगला कमावत असल्याने तिने लगेचच लग्नाला आपला होकार दिला. पण तिच्या पाळीव कुत्र्यामुळे हे लग्न मोडण्याचा निर्णय तिला घ्यावा लागला. करिश्माच्या घरात पाळीव कुत्री आहे. तिला आपल्या कुत्रीवर खूपच प्रेम आहे करिश्मा नेहमी सोशल मीडियावर कुत्र्यासोबतचे अनेक फोटो अपलोड करत असते. त्यामुळे तिचे श्वानप्रेम सगळ्यांचा माहिती आहेत.
परंतु तिच्या होणा-या नव-याने मात्र तिला मात्र आपल्याला कुत्रा आवडत नसल्याचे सांगितले. तसेच तिचे हे श्वानप्रेम दोघांच्या प्रेमाच्या आड येता कामा नये असेही तिला बजावले. आपल्या आईला देखील कुत्रे आवडत नसल्याचे त्याने करिश्माला मेसेजवर सांगितले. पण करिश्माने मात्र आपल्या कुत्रीला सोडण्यास नकार दिला. आपल्याशिवाय तिचे या जगात कोणीच नसल्याचे देखील तिने त्याला  सांगितले. याआधी तिच्या नव-याने तिला करिअरपेक्षाही कुटुंबाकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे ती नाराज होतीच पण तरीही तिच्या कुटुंबियांना तोच मुलगा तिच्यासाठी जोडीदार म्हणून योग्य वाटत होता म्हणून तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला पण नंतर कुत्र्याला सोडून दे म्हटल्यावर मात्र तिने थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. त्यावर तुला इतकेच वाटत असले तर त्या कुत्र्याशी लग्न कर असा सल्लाही त्याने दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bengaluru woman turned down a guys marriage proposal because he disliked her dog

ताज्या बातम्या