BEST Bus Driver Dance Video Ganesh Visarjan 2024 : गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राने आपल्या लाडक्या बाप्पाची भक्तीमय वातावरणात पूजा-अर्चा केली, यानंतर अनंत चतुर्थीला लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आले; “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”चे साकडे घालत बाप्पाला निरोप देताना सर्वच गणेशभक्तांचे डोळे पाणावले होते. (Ganesh Visarjan 2024) सगळीकडे विसर्जनानिमित्त मोठी गर्दी उसळली होती. काही ठिकाणी मध्यरात्री उशिरा आणि आज सकाळपर्यंत गणेश विसर्जन सुरू होते. ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्त बेभान होऊन नाचले. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहेत. यात मुंबईतील बेस्ट बसचालकाचा एक व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही आनंद होईल.

महाराष्ट्रासह मुंबईत मंगळवारी वाजत-गाजत धुमधडाक्यात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यात मुंबईतही मोठ्या जल्लोषात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. अशाच मुंबईतील एका मिरवणुकीत एक बेस्ट बसचालक चक्क आनंदात बेभान होऊन नाचताना दिसतोय. विसर्जन मिरवणुकीत बसचालकाने केलेला हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा डान्स पाहून नेटकरी या चालकाचं प्रचंड कौतुक करत आहेत आणि म्हणताहेत की, ड्रायव्हर जोमात, पॅसेंजर कोमात…

ड्रायव्हर काकांनी केला खतरनाक डान्स

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक बेस्ट बस गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकली होती. यावेळी काही लोक विसर्जन मिरवणुकीत बससमोर बेभान होऊन नाचण्याचा आनंद घेत होते. यावेळी बस ड्रायव्हरदेखील बसमधून त्यांना बघून हसत असतो. यावेळी रस्त्यावर नाचणारे लोक बस ड्रायव्हरला नाचायला येण्याचा आग्रह धरतात. शेवटी बस ड्रायव्हर पॅसेंजरने भरलेल्या बसमधून खाली उतरतो आणि काही सेकंद त्यांच्याबरोबर नाचतो. यावेळी नाचताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. ड्रायव्हर काकांचा हा व्हिडीओ युजर्सनाही फार आवडला आहे.

Read More Latest Trending Video : Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला साजरी होईल? जाणून घ्या नेमकी तारीख आणि महत्त्व

बेस्ट बस ड्रायव्हरच्या डान्सचा हा व्हिडीओ @yograjgosavi_offical नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘ड्रायव्हर जोमात, पॅसेंजर कोमात.’ दुसऱ्या युजरने लिहिलेय की, ‘व्वा, याला बोलतात खुशी’, तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘आमची मुंबई आणि आमचे मुंबईकर’, चौथ्या युजरने लिहिले की, ‘मुंबई शहर हे जगातील सर्वात भारी शहर आहे, ते सर्वच बाजूने एक परिपू्र्ण असे शहर आहे.’