viral Video: जसजसं इमारतींचे मजले वाढू लागले तसतसं रोजच्या चढण्या-उतरण्यासाठी ‘लिफ्ट’ची सुविधा ही उपलब्ध होऊ लागली. पाच मजल्यांच्या इमारतींपासून ते अगदी २० मजल्यांच्या इमारतींपर्यंत चढण्यासाठी नागरिकांना लिफ्टची गरज भासू लागली आहे. लिफ्टचा योग्यप्रकारे वापर म्हणजे प्रत्येकाकरिता एका सुरक्षित व आरामदायी प्रवास आहे. पण, हेच जर आपण लिफ्टचा अयोग्यरीत्या वापर केला तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत एक चिमुकला लिफ्टबरोबर मस्ती करताना दिसला आहे आणि यामुळे तो संकटात सापडला आहे.

व्हायरल व्हिडीओ चीनमधील आहे. एका अपार्टमेंटमध्ये चार ते पाच वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये एकटा उभा आहे. तसेच जसा व्हिडीओ पुढे जातो, तसा चिमुकला लिफ्टचा दरवाजा बंद होताना मध्ये हात ठेवून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्याला हा खेळ इतका मजेशीर वाटतो की, तो वारंवार दरवाज्याच्यामध्ये हात ठेवून लिफ्ट थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान, एकावेळी दरवाजा बंद झाल्यावर त्याचा हात अडकतो; पुढे नक्की काय घडतं हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…छोले भटुरे खा अन्… ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्याचा अनोखा जुगाड; PHOTO पाहून पोट धरून हसाल

व्हिडीओ नक्की बघा…

लिफ्टमध्ये अडकलो तर? हा विचारही आपल्याला भीतीदायक वाटतो. या भीतीने अनेक जण एकट्याने लिफ्टमध्ये जायला घाबरतात. लिफ्ट बंद पडल्यास त्या बंद जागेत जीव गुदमरणे, श्वास घ्यायला अडचण येणे स्वाभाविक आहे. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट बंद पडण्याच्या समस्येला अनेकवेळा सामोरे जावे लागते. यावेळी आपल्याबरोबर कोणी असेल तर ठीक, नाही तर अशा प्रसंगी स्वतःची सुटका कशी करायची असा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहतो.

तर आज व्हायरल व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. लिफ्टच्या दरवाजाबरोबर खेळता खेळता लिफ्टचा दरवाजा बंद होतो आणि चिमुकल्याचा हात अडकतो. चिमुकला बाहेर पडण्यासाठी व हात लिफ्टच्या दरवाजातून काढून घेण्यासाठी धडपडताना दिसतो. तसेच तो एका हाताने लिफ्ट उघडण्याचे बटणदेखील दाबताना दिसत आहे आणि येथेच व्हिडीओचा शेवट होतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @now_tw या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो अनेकांना थक्क करून सोडणारा आहे.