सध्या सोशल मीडियावर एका असाह्य आईने लिहिलेले हृदयद्रावक चिठ्ठी व्हायरल होत आहे. जी वाचल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले आहेत. खरं तर आजही अनेक स्त्रिया सासरच्या लोकांच्या छळाला बळी पडत आहेत. याबाबतच्या अनेक घटना आपण पाहत आणि वाचत असतो. सध्या अशीच एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये सासरच्या लोकांच्या भीतीपोटी एका आईने आपल्या पोटच्या लेकीला दवाखान्यातच सोडून दिलं आहे. शिवाय तिने आपल्या मुलीला सोडून जाताना जी चिठ्ठी लिहिली आहे ते सध्या व्हायरल होत आहे.

या महिलेने आपल्या चिठ्ठीत लिहिलं आहे, “मला आधीच सहा मुली आहेत, त्यामुळे माझी सासू मला त्रास देते म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. माझ्या मुलीला सांभाळा मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, मला माफ करा” ही चिठ्ठी भरतपूर येथील महिला रुग्णालयाच्या आवारात आपल्या नवजात मुलीला सोडून गेलेल्या आईने लिहिली आहे. आधीच ६ मुली असल्याने सासरचे लोक या महिलेचा छळ करत होते. अशातच सातवी देखील मुलगीच झाल्यामुळे तीने नवजात मुलीला रुग्णालयाच्या आवारात सोडले आणि चिठ्ठी लिहून ती बेपत्ता झाली. रूग्णालयाच्या आवारात रडणाऱ्या मुलीचा आवाज तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ऐकला आणि त्याला धक्काच बसला. शिवाय या घटनेची माहिती त्याने तात्काळ पोलिसांना दिली आणि मुलीला रुग्णालयात दाखल केलं.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

हेही वाचा- अधिकाऱ्याची पार्टी शेतकऱ्यांचे हाल; धरणात पडलेल्या मोबाईलसाठी २१ लाख लिटर पाणी घालवलं वाया

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भरतपूरमधील मथुरा गेट पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या जनाना रुग्णालयाच्या आवारात घडली. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रामवीर नावाच्या व्यक्तीला नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. रामवीर आवाजाच्या दिशेने गेला तेव्हा त्याला कपड्यात गुंडाळलेली नवजात मुलगी जमिनीवर आढळली. शिवाय ती खूप रडत होती. तिला पाहताच रामवीरला धक्का बसला. यावेळी त्याला मुलीच्या शेजारी त्याला एक कागद सापडला. रामवीर मुलगी आणि तो कागद घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना भेटून घटलेल्या प्रकरणाची माहिती दिली.

हेही पाहा- रस्त्यावर आंबे विकण्यासाठी लहान मुलाने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

दरम्यान, डॉक्टरांनी तातडीने मुलीला वॉर्डात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले. सुदैवाने, कडक उन्हातही मुलीला काहीही झाले नाही. भटक्या प्राण्यांपासूनही मुलगी वाचली. रुग्णालय व्यवस्थापनाच्या माहितीवरून बालकल्याण समितीचे सदस्यही तेथे पोहोचले आणि त्यांनी रामवीरकडून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. शिवाय आता पोलिसांनी मुलीच्या आईचा शोध सुरू केला आहे. तर सापडलेल्या मुलीचा जन्म तीन दिवसांपूर्वी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

महिलेने लिहिलेले चिठ्ठी व्हायरल –

नवजात बालकाकडून सापडलेल्या चिठ्ठीवर “मला आधीच ६ मुली आहेत, त्यामुळे माझी सासू मला त्रास देते, म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. माझ्या मुलीला सांभाळा मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, मला माफ करा” असं लिहिलं आहे. भरतपूर जनना रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिमांशू गोयल यांनी सांगितले की, नवजात मुलगी रुग्णालयाच्या आवारात टाकून दिलेली आढळून आली. तिची आई तिला येथे सोडून गेल्याचे दिसते. मुलीवर सध्या उपचार सुरू असून तिची त्यांची प्रकृती स्थिर आहे.