सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यामध्ये लग्नाशी संबंधित व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कधी लग्नाच्या स्टेजवर भन्नाट डान्स करणाऱ्या नवरदेवाचा तर कधी वडिलांच्या गळ्यात पडून रडणाऱ्या वधूचा व्हिडीओ व्हायरल होत असतो. पण सध्या लग्नाच्या स्टेजवरील असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.
हो कारण या लग्न समारंभात एका भटजींनी असा काही जुगाड केला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्न समारंभासाठी स्टेज सजवल्याचं दिसत आहे. शिवाय या स्टेजवर अनेक लोक उपस्थित आहेत. पण स्टेजवर उपस्थित असणारे सगळे लोक भटजींकडे पाहत हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. ते का हसत आहेत हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळेल.
कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भटजी तोंडातून शंखासारखा आवाज काढतात, तर ते त्यांचा शंख घरी विसरले म्हणून त्यांनी तोडांतून शंखासारखा आवाज काढल्याचं पाहून उपस्थितांना हसू आवरणं कठीण झालं. भटजींचा हा व्हिडिओ @captured_by_minks नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “भटजी आपला शंख घऱी विसरले म्हणून त्यांनी शंखासारखा आवाज काढला. मल्टीटॅलेंटेड भटजी” सध्या या भटजींनी केलेल्या भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३ लाखांहून अधिक लाईक्स आणि ५१ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.