Bhopal Night Club Fight: A viral video shows drunk women fighting intensely outside a Bhopal pub, creating a major scene : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे रात्री एका पार्टीमध्ये चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी पहाटे एका नाईट क्लबच्या बाहेर चार मद्यधुंद महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली, हा सर्व गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

रात्री उशीरापर्यंत चाललेल्या पार्टीनंतर ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या चार महिला नाईट क्लबमधून बाहेर पडल्या आणि त्यांच्यात वाद सुरू झाला, आणि लवकरच हा वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. भर रस्त्यामध्येच या महिलांमध्ये हाणामारी सुरू झाली.

व्हिडीओ फुटेजमध्ये दिसून येत आहे की, या या महिला एकमेकींना बुक्क्यांनी मारहाण करत आहेत, एकमेकींचे केस ओढत आहेत आणि रस्त्यावर एकमेकींना ढकलून देत आहेत. यावेळी काही लोकांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. या हाणामारीत एक महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पुढील कारवाई ही दोन्ही पक्षांपैकी कोणी तक्रार देण्यासाठी पुढे येते का, यावर अवलंबून असेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.