नेपाळमधील माउंट मानास्लू येथील बेस कॅम्पला हिमस्खलनाचा तडाखा बसला आहे. हिमस्खलन इतके मोठे होते की संपूर्ण बेस कॅम्प त्याच्या तावडीत सापडले. संपूर्ण परिसर बर्फाने व्यापून गेल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. या घटनेमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

ताशी लकपा शेर्पा यांचा हा व्हिडिओ असून एएनआयने तो शेअर केला आहे. माउंट मानास्लू या उंच पर्वताखालील अनेक तंबूंच्या दिशेने बर्फाची मोठी लाट जाताना दिसून येत आहे. यावेळी लोक इकडे तिकडे आश्रयासाठी पळत सुटले, मात्र काही क्षणातच या झोपड्यांना हिमस्खलनाची जोरदार धडक बसते. नंतर संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरल्याचे व्हिडिओत दिसून येते.

(Viral : नकली झेब्रा बनलेल्या व्यक्तींना सिंहीणींनी सळो की पळो करून सोडले, पुन्हा असे धाडस करणार नाही.. पाहा व्हिडिओ)

अंगावर काटा आणणारे हे दृश्य आहे. कसेबसे आपले प्राण वाचवण्यासाठी लोक शर्थीचे प्रयत्न करताना दिसून आले. काहींनी हिमस्खलनापासून संरक्षणासाठी घरांचा आधार घेतला. या वर्षी नेपाळ सरकारने मानास्लू पर्वत चढण्यासाठी ४०० लोकांना परवानगी दिली आहे. मात्र, हिमस्खलनाचा धोका पाहता चढाई सोपी नसल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.

या आधी २६ सप्टेंबरला देखील मानास्लू येथील बेस कॅम्पला हिमस्खलनाचा तडाखा बसला होता. या घटनेत २ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता आणि ११ लोक जखमी झाले होते. यावेळी झालेल्या घटनेत जिवाची हाणी झालेली नाही. केवळ काही तंबू उद्ध्वस्त झाले आहेत, असे शेर्पा यांचे म्हणणे आहे.