big Avalanche hit base camp on mount Manaslu in nepal | Loksatta

Viral : पर्वताखालील तंबूना हिमस्खलनाचा जोरदार तडाखा, जीव मुठीत धरून पळत सुटले गिर्यारोहक, पाहा थरारक व्हिडिओ

नेपाळमधील माउंट मानास्लू येथील बेस कॅम्पला हिम्सखलनाचा तडाखा बसला आहे. हिम्सखलन इतके मोठे होते की संपूर्ण बेस कॅम्प त्याच्या तावडीत सापडले.

Viral : पर्वताखालील तंबूना हिमस्खलनाचा जोरदार तडाखा, जीव मुठीत धरून पळत सुटले गिर्यारोहक, पाहा थरारक व्हिडिओ
हिमस्खलन

नेपाळमधील माउंट मानास्लू येथील बेस कॅम्पला हिमस्खलनाचा तडाखा बसला आहे. हिमस्खलन इतके मोठे होते की संपूर्ण बेस कॅम्प त्याच्या तावडीत सापडले. संपूर्ण परिसर बर्फाने व्यापून गेल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. या घटनेमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

ताशी लकपा शेर्पा यांचा हा व्हिडिओ असून एएनआयने तो शेअर केला आहे. माउंट मानास्लू या उंच पर्वताखालील अनेक तंबूंच्या दिशेने बर्फाची मोठी लाट जाताना दिसून येत आहे. यावेळी लोक इकडे तिकडे आश्रयासाठी पळत सुटले, मात्र काही क्षणातच या झोपड्यांना हिमस्खलनाची जोरदार धडक बसते. नंतर संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरल्याचे व्हिडिओत दिसून येते.

(Viral : नकली झेब्रा बनलेल्या व्यक्तींना सिंहीणींनी सळो की पळो करून सोडले, पुन्हा असे धाडस करणार नाही.. पाहा व्हिडिओ)

अंगावर काटा आणणारे हे दृश्य आहे. कसेबसे आपले प्राण वाचवण्यासाठी लोक शर्थीचे प्रयत्न करताना दिसून आले. काहींनी हिमस्खलनापासून संरक्षणासाठी घरांचा आधार घेतला. या वर्षी नेपाळ सरकारने मानास्लू पर्वत चढण्यासाठी ४०० लोकांना परवानगी दिली आहे. मात्र, हिमस्खलनाचा धोका पाहता चढाई सोपी नसल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.

या आधी २६ सप्टेंबरला देखील मानास्लू येथील बेस कॅम्पला हिमस्खलनाचा तडाखा बसला होता. या घटनेत २ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता आणि ११ लोक जखमी झाले होते. यावेळी झालेल्या घटनेत जिवाची हाणी झालेली नाही. केवळ काही तंबू उद्ध्वस्त झाले आहेत, असे शेर्पा यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आयुष्यातील टेन्शन बाजूला सारून काकांनी केला जबरदस्त नागीण डान्स; Viral Video घातला इंटरनेटवर धुमाकूळ

संबंधित बातम्या

Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत
लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता
Viral : श्वानाने पिलाला खेळण्यासाठी दिला बॉल, उत्साही पिलाने जे केल ते पाहून तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल
Video: माउंटेन सिंहाने ‘भुताचा’ आवाज काढताच पोलीसाला फुटला घाम; थेट पळत सुटला अन..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती