Ambernath Truck Bike Accident: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. अंबरनाथमधून असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. झालं असं की अंबरनाथमध्ये एक बाईकचालक डावीकडे वळण घेत असताना पाठीमागून ट्रक आला आणि तो अक्षरश: तरुणाच्या अंगावरुन गेला. हा व्हिडीओ पाहताना सुरुवातीला नक्की काय आणि कसं घडलं हेच कळतं नाही, मात्र हा तरुण मृत्यूच्या दारात कसा पोहचला बघा आणि तुम्हीच सांगा यामध्ये नक्की चूक कोणाची आहे?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, संपूर्ण रस्त्यावर वाहनांची बऱ्यापैकी वर्दळ सुरु आहे तर एका बाजूला सिग्नल लागल्याने वाहनांची रांग लागलेली आहे. मात्र ज्या बाजूला रिकामा रस्ता आहे, त्या रस्त्यावरुन दोन ट्रक एकावेळी जाताना दिसत आहे. मात्र जसा दुसरा ट्रक तेथून जातो त्याच वेळी ट्रकखाली एक दुचारीस्वार येतो आणि हा बाईक चालक अक्षरश: ट्रकखाली येतो. मात्र फक्त नशिब बलवत्तर म्हणून तो दुचाकीपासून लांब पडतो आणि बचावतो तर दुसरीकडे दुचाकीचा संपूर्ण चूराडा होतो. सुदैवाने ट्रकची चाकं त्याच्या अंगावरून वरून गेली नाही. त्यामुळेच त्याचा जीव बचावला. व्हिडीओ पाहून सर्व जण हैराण झाले आहेत.

चूक नेमकी कुणाची ?

ही सर्व धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. मात्र या सगळ्यात बाईक चालकाची चूक आहे की ट्रकचालकाची चूक आहे हे गोंधळात टाकणारं आहे. काहीजण म्हणतात की, या अपघातात बाईकवाल्याची चूक आहे कारण त्यानं उगाच पुढे जायला नको होतं. तर काही जणं म्हणताहेत की, ट्रकवाल्यानं चुकीच्या पद्धतीनं वळण घेतलं म्हणून अपघात झाला. आता तुम्हीच हा व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच सांगा यामध्ये नक्की चूक कोणाची आहे?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मुलाचा वाढदिवस ठरला आईच्या आयुष्याचा शेवटचा दिवस; पतीच्या खांद्यावर डोकं ठेवताच कोसळल्या, नेमकं काय घडलं?

@gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.