Nikki Tamboli Pune Video : बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून हा शो सतत वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत आहे. या घरात वादाचे प्रमुख कारण ठरते ते म्हणजे अभिनेत्री निक्की तांबोळी. निकी सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ट्रॉलर्सच्या निशाणावर येत आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख तिला दरवेळी काही ना काही सुनावतो मात्र तरीही तिच्यात काहीच बदल जाणवत नाही.प्रत्येक भागांत चर्चा होतेय ती फक्त निक्कीची. बरं, ही चर्चा फारशी सकारात्मक नाहीये, कारण ती सतत इतर स्पर्धकांची उणीधुणी काढताना दिसते. त्यांचा अपमान करते. असभ्य भाषेत त्यांच्यावर टीका करतेय. त्यामुळे निक्की तांबोळी हे नाव सध्या ट्रेंडींगवर आहे, दरम्यान पुण्यातील एका दहिहंडी कार्यक्रमात याचाच प्रतय्य आला. पुण्यात निक्की तांबोलीच्या डायलॉगचा जलवा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

निक्की बिगबॉसच्या घरात आल्यावर तिने एक डायलॉग मारला होता. बाईSSSS! हा डायलॉग ती इतर स्पर्धकांना चिडवण्यासाठी मारते, मात्र बाहेर हा डायलॉग चांगलाच व्हायरल झाला आहे. आणि याच डायलॉगचा जलवा पुण्यात पाहायला मिळाला. निक्कीने गप्पा मारताना आपल्या खास शैलीत बाईSSS हा शब्द उच्चारला होता. त्याचे अनुकरण घरातील इतर सदस्यही करतात. सोशल मीडियावरही ‘बाईSSS’, ‘बाईSSS हा काय प्रकार’ हे निक्कीचे डॉयलॉग चांगलेच गाजत आहेत.

पुण्यात पार पडलेल्या दहीहंडी सेलिब्रेशनमध्ये डीजेच्या तालावर गोविंदाही थिरकले. यावेळी डीजेवर सुरू असलेल्या गाण्यात निक्कीचा जलवा दिसला यावेळी तरुणाईतलं वातावरण चांगलंच तापलं. निक्कीच्या खास शैलीतील ‘बाईSSS’ हा शब्द गाण्यात मिक्सिंग करण्यात आले. निक्कीच्या स्टाईलमध्ये बाईSSS हा शब्द अनेक गाण्यात मिक्स करण्यात आला होता. निक्कीचा बाईSSS हा डायलॉग आणि त्या गाण्यांवर थिरकणारे पुणेकर असा एक वेगळ्याच माहोल झाल्याचं पाहायला मिळालं. गाण्याची झलक असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: जेव्हा नवरदेव विसरतो हळद त्याचीच आहे; असा नाचला की नेटकरीही म्हणाले “थांब भावा लग्न मोडेल”

‘ही’ निक्की तांबोळी आहे तरी कोण? Nikki Tamboli

निक्कीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ रोजी औरंगाबादमध्ये झाला असून ती महाराष्ट्रीयन आहे. तिने औरंगाबादमध्येच पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनतर ती आता डोंबिवलीमध्ये राहात आहे. आता निक्कीला मराठी बिग बॉसमध्ये पाहून सर्वजण आनंदी झाले आहेत.मॉडेल म्हणून निक्कीने करिअरची सुरुवात केली आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले. कांचन 3, थिप्पारा मीसम (2019) आणि चिकाती गाडिलो चिथकोटुडु (2019) – या चित्रपटात निक्कीने काम केलं आहे.निक्की याआधी मराठी बिग बॉस १४मध्ये दिसली होती. आता ती पुन्हा एकदा मराठी बिग बॉसमध्ये दिसत आहे.