Suraj Chavan Follow Magical Splash Trend Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. यात जर तुम्ही सोशल मीडियावर खूप अॅटिव्ह असाल तर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून लोक पाणी आणि हळदीचा एक भन्नाट ट्रेंड वेड्यासारखा फॉलो करत असल्याचे पाहत असाल. विशेषत: लहान मुलांसह मोठ्यांनाही हा ट्रेंड खूप आवडलाय. यात आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि अभिनेता सूरज चव्हाणलाही या ट्रेंडचं वेडं लागयलं. पण, सूरजनं त्याच्या झापूक झुपूक स्टाईलमध्ये हा ट्रेंड फॉलो केलाय. नुकताच त्याने या ट्रेंडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय, जो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
सूरजने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे, ज्यात तो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होणारा Magical Splash (Turmeric glow) ट्रेंड फॉलो करताना दिसतोय. व्हिडीओत पाहू शकता, सूरजनेही इतर लोक ज्याप्रकारे हा ट्रेंड फॉलो करतायत त्याचप्रकारे एका काचेच्या ग्लासात पाणी घेतलं आणि तो पाण्याने भरलेला ग्लास मोबाइलच्या फ्लॅशवर ठेवला. यानंतर त्याने पाण्यात हळद टाकली. हळद पाण्यात विरघळताच पाण्याचा रंग सोनेरी पिवळा होतो, हे दृश्य स्मित हास्य देत तो एकटक पाहत असतो.
याचवेळी पाठीमागून त्याची बहीण येते आणि त्याच्या डोक्यात मारत मजेत म्हणते की, भाजीला हळद नाही आणि तू काय हळद नासवतोय. हा व्हिडीओ शेअर करत सूरजने, नवीन ट्रेंड करावं म्हणलं तर ताईचं बघा, असं कॅप्शन लिहिलं आहे.
सूरजने हा व्हिडीओ अतिशय मजेशीर ढंगात शूट केलाय, त्यामुळे नेटकऱ्यांनीही व्हिडीओवर गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, भावा मनावर घेऊ नको, ह्या बहिणी अशाच असतात. दुसऱ्याने लिहिले की, ट्रेंडच्या नावाखाली ताईंनी चांगलाच रपाटा मारायचा चान्स घेतलाय. तिसऱ्या एकाने लिहिले की, ताईनी ट्रेंडची वाट लावली. शेवटी एकाने मिश्कीलपणे लिहिले की, ह्या ट्रिकमुळे महाराष्ट्रात हजारो किलो हळद वाया गेली, पुढील महिन्यात हळदीचे भाव गगनाला भिडणार, सूत्रांच्या माहितीनुसार.