scorecardresearch

हुंडा कमी दिला म्हणून नवरदेवाने लग्नाला दिला नकार, VIRAL VIDEO पाहून लोक संतप्त

एकविसाव्या शतकानंतरही समाजातून हुंडा ही प्रथा पूर्णपणे नष्ट झालेली नाही. हुंडा न मिळाल्याने काही महिलांचा बळी जातो, तर कुठे लग्न मोडले जातात. या घटना दररोज बातम्यांमधून समोर येत असतात. बिहारमध्ये अशीच एक घटना घडली आहे.

Bihar-Dovery-Viral-Video

आज हुंडा हा शब्द सर्वांनाच परिचित आहे. एकविसाव्या शतकानंतरही समाजातून हुंडा ही प्रथा पूर्णपणे नष्ट झालेली नाही. आजही अनेक लोभी लोक हुंड्यासाठी महिलांचा छळ करत आहेत. हुंडा न मिळाल्याने काही महिलांचा बळी जातो, तर कुठे लग्न मोडले जातात. या घटना दररोज  बातम्यांमधून समोर येत असतात. बिहारमध्ये अशीच एक घटना घडली आहे. हुंडा कमी मिळाला म्हणून नवरदेवाने चक्क लग्नाला नकार दिला. नवरदेवाचे म्हणणे आहे की मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला दिलेल्या वचनापेक्षा कमी हुंडा दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्स वरावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.


या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती संंतापलेल्या नवरदेवाला लग्न न करण्यासाठीचं कारण विचारताना दिसून येतोय. यावेळी बोलताना नवरदेव म्हणतो की, “आमची मागणी पूर्ण झालेली नाही. यासबतच तो म्हणतो की, रोख रकमेव्यतिरिक्त आणकी इतर गोष्टी देणार असं सांगितलं होतं. जर मुलीच्या कुटूंबियांनी आमच्या मागण्याच पूर्ण केल्या नाहीत तर मग आम्ही लग्न कशाच्या आधारावर करायचं? या व्हिडीओमध्ये नवरदेव म्हणतो की, मी सरकारी नोकरी करतो आणि माझे वडीलही सरकारी शिक्षक आहेत.  

या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या शेजारी बसलेली नवरी त्या मुलाला समजावून सांगताना दिसूून येत आहे. “आमच्या वडिलांनी सर्व पैसे नंतर देऊ असंं सांगितलं आहे”, असं ती बोलताना दिसत आहे. यावर नवरदेव म्हणतो की चैन आणि अंगठीही दिली नाही. मला आता पूर्ण हूंडा हवा आहे. त्याचबरोबर आजकाल हुंडा न घेता कोण लग्न करतं, असंही नवरदेव म्हणताना दिसून येत आहे. 

आणखी वाचा : Russia-Ukraine War : युक्रेनच्या युद्धभूमीवरच केलं लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :


या व्हिडीओवर पत्रकार प्रज्ञा मिश्रा यांनी कमेंट करताना लिहिलं आहे की, “शिक्षक पिता आणि सरकारी नवरदेवाला तुरुंगात पाठवलं पाहिजे. हुंडा घेणे हा आपल्या देशात गुन्हा आहे. अशा सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांच्या मदतीने आपण विश्वगुरू बनण्याची तयारी करत आहोत.” दयानंद कांबळे नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशा लोकांना लाज का वाटत नाही, असंं त्यांनी या कमेंटमध्ये लिहिलंय. 


सूरज नावाच्या ट्विटर हँडलवरून एक कमेंट आली की, “सरकारी नोकरीच्या नियमानुसार हुंडा घेणाऱ्यावर कारवाई केली जाते. जर हा व्हिडीओ खरा असेल तर या व्यक्तीला नोकरीवरून काढून टाका. रमन कुमार नावाच्या एका ट्विटर यूजरने कमेंट केली की, “ही मुलगी त्याला कानशिलात का मारत नाही? अशा लोकांचं लग्न व्यर्थ आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bihar a groom with a government job refused to marry for not getting dowry the video went viral on social media prp

ताज्या बातम्या